आधार लिंक अनिवार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:35 AM2021-04-09T04:35:53+5:302021-04-09T04:35:53+5:30
योजनेला हरताळ अंबाजोगाई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या माध्यमातून गावोगावी गरीब लाभार्थींना अन्नपुरवठा स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून होतो. पुरवठा होत ...
योजनेला हरताळ
अंबाजोगाई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या माध्यमातून गावोगावी गरीब लाभार्थींना अन्नपुरवठा स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून होतो. पुरवठा होत असलेला गहू, तांदूळ हा हलक्या दर्जाचा आहे. तक्रारीनंतरही लक्ष दिले जात नाही. यावर नियंत्रणाची मागणी होत आहे.
नियमांचे पालन करा
माजलगाव : कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यावर उपाययोजना म्हणून मास्क लावणे तथा सामाजिक अंतराचे पालन करणे तसेच कोरोना नियमांचे पालन व उपाययोजनांसाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले जात आहे.
स्थानकाची दुरवस्था
मांजरसुंबा : येथील बसस्थानकात शौचालयासह इतर सुविधांचा अभाव आहे. तसेच दुरवस्था झाल्यामुळे नागरिकांसह प्रवाशांची गैरसोय होत आहे. धुळे-सोलापूर महामार्गावरील तसेच लातूर, पुणे या मार्गावरील बस येथे थांबतात. स्थानकात सुविधा देण्याची मागणी होत आहे.
बसस्थानक परिसरात निवारा गरजेचा
वडवणी : शहरातील बसस्थानक हे नगर पंचायतीच्या बचतगट भवनात आहे. तेथून वाहतूक नियंत्रण कक्ष चालवला जातो. या ठिकाणाहून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना उघड्यावरच ताटकळत थांबावे लागते. निवारा, शौचालय, पाणी या सुविधा देण्याची मागणी होत आहे.
रस्ता कामाची गती वाढविण्याची मागणी
अंबाजोगाई : गेल्या दोन वर्षांपासून पिंपळा ते मांजरसुंबा या महामार्गाचे काम संथ गतीने सुरू आहे. रस्त्यावर मातीमिश्रित मुरूम टाकण्यात आल्याने हा रस्ता संपूर्णत: खड्डेमय झाला आहे. या खडतर रस्त्यावरून प्रवास करताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. संथ गतीने काम सुरू असलेला हा रस्ता वाहनचालकांसाठी तत्काळ पूर्ण करण्याची मागणी होत आहे.