‘आधार माणुसकी ग्रुप’तर्फेे दोन शाळांना पुस्तकांसह कपाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:33 AM2021-03-26T04:33:45+5:302021-03-26T04:33:45+5:30
गेवराई : येथील ‘आधार माणुसकी ग्रुप’च्यावतीने तालुक्यातील धोंडराई जिल्हा परिषद शाळा व बोरी पिंपळगाव येथील शाळेला विविध ...
गेवराई : येथील ‘आधार माणुसकी ग्रुप’च्यावतीने तालुक्यातील धोंडराई जिल्हा परिषद शाळा व बोरी पिंपळगाव येथील शाळेला विविध प्रकारची पुस्तके व पुस्तके ठेवण्यासाठी कपाट असे २० हजारांचे साहित्याचे वाटप गुरुवारी करण्यात आले.
येथील ठाण्याचे पोलीस नाईक रंजित पवार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘आधार माणुसकी ग्रुप’च्या वतीने आजपर्यंत विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत. गुरुवारी सकाळी तालुक्यातील धोंडराई येथील जिल्हा परिषद शाळा येथे आधार माणुसकी ग्रुपच्या वतीने प्रत्येकी पाच हजार रुपयाची मुलांना प्रेरणा व बुद्धीला चालना देणारी व वाचनीय असे दर्जेदार पुस्तके तसेच पुस्तके खराब होऊ नये म्हणून पाच हजार रुपयांचे कपाट असे दहा हजारांचे साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच बोरीपिंपळगाव येथील शाळेतदेखील पाच हजारांचे पुस्तके व कपाट असे दहा हजारांच्या साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला सहारा बालग्रामचे संतोष गर्जे, ’आधार माणुसकी ग्रुप’चे पोलीस रंजित पवार, सखाराम शिंदे, मुख्याध्यापक लहू चव्हाण, गणेश शहाणे, अरुण खरात, बप्पासाहेब काळे, नितीन माळी, संजय पांढरे, धर्मराज करपे, जालिंदर ठवरे, प्रकाश खरात, प्रेम सिडाम, मंतू दातीरसह विद्यार्थी उपस्थितीत होते. हे वीस हजार रुपयांची पुस्तके व कपाटाचे साहित्य पोलीस रंजित पवार, किरण बेदरे, दादा माळी, भागवत पवार, अमोल देशमुख, महेश चौरे. गणेश लगड साहेब, दत्ता बळवंत, नितीन जगधने, सुभाष काळे, नितीन राठोड, प्रशांत माने, महादेव खरे, रवी उफाडे, स्वामी अण्णा , गणेश मंचरे, गणेश जराड, परीक्षित करपे, योगेश बेदरे यांच्या योगदानातून वाटप करण्यात आले.
===Photopath===
250321\sakharam shinde_img-20210325-wa0021_14.jpg