अबब... नगर रोडच्या एका बाजूने १७२७ खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:40 AM2021-09-17T04:40:46+5:302021-09-17T04:40:46+5:30

बीड : शहरात विविध रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून, याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आम आदमी पक्षाच्यावतीने खड्डे गणना आंदोलन ...

Abb ... 1727 pits on one side of Nagar Road | अबब... नगर रोडच्या एका बाजूने १७२७ खड्डे

अबब... नगर रोडच्या एका बाजूने १७२७ खड्डे

Next

बीड : शहरात विविध रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून, याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आम आदमी पक्षाच्यावतीने खड्डे गणना आंदोलन करण्यात आले. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बालेपीर या नगर रोडवरील एका बाजूचे खड्डे गुरुवारी मोजण्यात आले. यावेळी १,७२७ लहान-मोठे खड्डे असल्याचे या आंदोलनादरम्यान लक्षात आले.

नगर रोडवर जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद व इतर मुख्य कार्यालये तसेच न्यायालय, कारागृह, तहसील, पंचायत समिती, जिल्हाधिकारी निवास, शासकीय विश्रामग्रह, पोलीस मुख्यालय तसेच बीड मतदारसंघाचे आमदार व नगरपालिकेचे नगराध्यक्ष, नगरसेवकांचा बंगलादेखील आहे. शहरातील रस्त्यावर खड्ड्यांची अशी परिस्थिती असेल, तर बीड शहर व मतदार संघातील नागरिकांचे काय, असा प्रश्न यावेळी आंदोलनाचे प्रमुख ‘आप’चे जिल्हाध्यक्ष अशोक येडे यांनी केला. शहरातील रस्त्यांंची दुरवस्था झाली असून, त्यामुळे नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत असल्याने जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ‘आप’चे सचिव रामधन जमाले. प्रा. ज्ञानेश्वर राऊत, सय्यद सादेक, बाळासाहेब घुमरे, माऊली शिंदे, पंडित वाघमारे, संदीप घाडगे, अक्रम शेख, हाबिबा बाबा आदी उपस्थित होते.

160921\16_2_bed_15_16092021_14.jpg

शहरातील नगररोडवरील एका बाजुचे खड्डे मोजताना आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्षक्ष अशोक येडे व इतर पदाधिकारी 

Web Title: Abb ... 1727 pits on one side of Nagar Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.