१६ वर्षीय नवविवाहितेचे अपहरण; वडवणी तालुक्यात खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 10:51 AM2020-06-24T10:51:37+5:302020-06-24T10:52:38+5:30
वडवणी ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल
वडवणी : तालुक्यातील मौजे खडकी येथील नवविवाहिता पतीच्या घरी असताना शौचालयासाठी घराच्याबाहेर पडल्यानंतर परतली नाही. या घटनेमुुळे एकच खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील मौजे खडकी येथील 25 वर्षीय तरूणाचा विवाह कामखेडा येथील 16 वर्षीय 6 महिने असलेल्या मुलीशी 14 जून रोजी विवाह झाला होता. दि 15 जून रोजी राञी ८ च्या सुमारास नवविवाहित नवरी ही शौचालयासाठी घराच्या बाहेर गेली ती परत आलीच नाही.
यामुळे घरच्या मंडळींनी शोधाशोध केली माञ सापडत नसल्याने फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात कलम 363,366अ 498भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि महेश टाक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पोलिस राम बारगजे, चंद्रसेन माळी एन एस वडमारे, लखन गंगावणे हे करत आहेत.
दरम्यान, तपास करताना नवविवाहित मुलीचे वय हे 16 वर्षे 6 महिने असल्याचे उघडकीस आले. यामुळे राम बारगजे यांच्या फिर्यादीवरून बालविवाह अंतर्गत ही गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरील गुन्हा बीड ग्रामीण पोलिसकडे सोपविला आहे.