अंत्यविधीच्या पैशांसाठी भांडणाऱ्या कर्मचाऱ्यांना अभय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:35 AM2021-05-07T04:35:20+5:302021-05-07T04:35:20+5:30

माजलगाव: शहराजवळ असलेल्या ईगलवूड कोविड केअरसेंटरमध्ये मयत झालेल्या रूग्णाच्या नातेवाइकाकडून पैसे घेण्याच्या कारणावरून नगरपालिकेचे कर्मचारी व सफाई कामगारांमध्ये मंगळवारी ...

Abhay to the employees fighting for the funeral money | अंत्यविधीच्या पैशांसाठी भांडणाऱ्या कर्मचाऱ्यांना अभय

अंत्यविधीच्या पैशांसाठी भांडणाऱ्या कर्मचाऱ्यांना अभय

Next

माजलगाव: शहराजवळ असलेल्या ईगलवूड कोविड केअरसेंटरमध्ये मयत झालेल्या रूग्णाच्या नातेवाइकाकडून पैसे घेण्याच्या कारणावरून नगरपालिकेचे कर्मचारी व सफाई कामगारांमध्ये मंगळवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास या कर्मचाऱ्यांमध्ये मारामारी

दोन दिवसापूर्वी घडलेली असतांना नगरपालिका प्रशासनाने या कर्मचाऱ्यांवर अद्याप कसल्याच प्रकारची कारवाई केली नाही. या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते ओमप्रकाश मालपाणी यांनी केली आहे.

कोरोना मयत रूग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याकडून सर्रास व खुलेआम पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी वारंवार होत होत्या. परंतु पैसे न दिल्यास अंत्यविधीसाठी हे कर्मचारी टाळाटाळ करत आहेत. यामुळे नातेवाईकांना उशीर होत असल्याने ते नाईलाजास्तव पैसे दयावे लागत आहेत. या घेतलेल्या पैशावरून नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांत वारंवार वाद होत आहेत. मंगळवारी रात्री ईगलवूड कोविड केअर सेंटरमध्ये एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला होता. या मयत झालेल्या रूग्णाचा मृतदेह नगरपालिकेचे सफाई कामगार विलेश कांबळे व संकेत कांबळे हे बांधत असतांना या ठिकाणी नगरपालिकेचे कार्यालयीन अधिक्षक गणेश डोंगरे , पाणीपुरवठा अभियंता जगदीश जाधवर , कंटेंटमेंट झोन प्रमुख संतोष घाडगे यांनी मद्यधुंद अवस्थेत आले व

कोरोनाबाधीत मृतांच्या अंत्यविधीसाठी पैसे घेण्यावरून मारामारी झाली होती.

ही घटना होऊन दोन दिवस उलटले असतांना त्या कर्मचाऱ्यांवर नगरपालिका प्रशासनाने अद्याप कसल्याच प्रकारची कारवाई केलेली नाही. नगर परिषदेने या कर्मचाऱ्यांवर कारवाई न केल्यामुळे न. प. विरोधात रोष निर्माण होत आहे. या कर्मचाऱ्यांना पाठीशी घालण्यामागे काय कारण आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. कार्यालयीन अधीक्षक गणेश डोंगरे व पाणीपुरवठा अभियंता जगदीश जाधवर हे मुख्याधिकाऱ्यांचे विश्वासु असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यात बोलले जात आहे.

सदरील घटना ही निंदणीय असून संबधित कर्मचाऱ्यांना नोटीस बजावून त्यांना त्यांचे म्हणणे सादर करण्यास सांगण्यात येणार आहे. यापुढे या कर्मचाऱ्यांकडून कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घेण्यात येईल.

--- शेख मंजुर , नगराध्यक्ष, माजलगाव.

Web Title: Abhay to the employees fighting for the funeral money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.