कितीही भयंकर परिस्थितीत आरोग्य सुविधा देण्यात सक्षम : धनंजय मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 01:43 PM2021-05-22T13:43:35+5:302021-05-22T13:45:15+5:30

आमदार बाळासाहेब आजबे यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी येथील बी.डी. हंबर्डे कॉलेज येथे आधार कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे.

Able to provide health facilities no matter how dire the situation: Dhananjay Munde | कितीही भयंकर परिस्थितीत आरोग्य सुविधा देण्यात सक्षम : धनंजय मुंडे

कितीही भयंकर परिस्थितीत आरोग्य सुविधा देण्यात सक्षम : धनंजय मुंडे

googlenewsNext

आष्टी : आॅक्सिजनची निर्मिती जिल्ह्यातच केली जाणार असून यापुढील १ महिन्यात बाहेरून आॅक्सिजन मागवण्याची गरज भासणार नाही. दुसरी लाट रोखण्यास बीड जिल्ह्याला यश आले आहे. यापुढे कितीही मोठी आपत्ती आली तरी आरोग्य सुविधा देण्यास कमी पडणार नाहीत अशी ग्वाही पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. ते अॅड.बी.डी.हंबर्डे महाविद्यालयातील आधार कोविड सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. 

आमदार बाळासाहेब आजबे यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी येथील बी.डी. हंबर्डे कॉलेज येथे आधार कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे. केंद्राचे  उद्घाटन आज सकाळी १० वाजता पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्त करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार उद्घाटनास ऑनलाईन माध्यमातून उपस्थित होते. यावेळी मुंडे म्हणाले की, आपत्तीजनक परिस्थिती उद्भवू नये यासाठी आम्ही सर्वोतपरी प्रयत्न करतोय. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे . यासाठी सर्वांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन मुंडे यांनी केले. तर आ. रोहित पवार यांनी येथील कोविड सेंटर व आष्टी मतदारसंघाच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहिल असे आश्वासन दिले. 

यावेळी व्यासपीठावर आ. रोहित पवार, आ. संदीप  क्षिरसागर, आ.बाळासाहेब आजबे, आ. यशवंत माने, माजी आ. साहेबराव दरेकर, माजी आ. अमरसिंह पंडित, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, युवा प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, रामकृष्ण बांगर , भाऊसाहेब लटपटे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष शिवाजी राऊत, जि‌‌. प. सदस्य सतीश शिंदे आदींची उपस्थिती होती. तसेच किशोर हंबर्डे, शिरीष थोरवे, परमेश्वर शेळके, मनोज चौधरी, अण्णासाहेब चौधरी, दिगांबर पोकळे, बाबासाहेब वाघुले, सरपंच अशोक पोकळे,नाजिम शेख आदी उपस्थित होते.

Web Title: Able to provide health facilities no matter how dire the situation: Dhananjay Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.