आपेगाव परिसरात हरभरा काढणीची लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:38 AM2021-03-01T04:38:40+5:302021-03-01T04:38:40+5:30
रब्बी हंगामातील पिके काढणीला आली आहेत. नव्याची पौर्णिमा हा सण मजुरांनी साजरा केला नाही. सकाळी सहा वाजेपासून शेतात काढणीस ...
रब्बी हंगामातील पिके काढणीला आली आहेत. नव्याची पौर्णिमा हा सण मजुरांनी साजरा केला नाही. सकाळी सहा वाजेपासून शेतात काढणीस सुरू होत आहे. त्यातच उन्हाची तीव्रता जाणवू लागली होती. अवकाळीच्या भीतीने मजुरांचा तुटवडा आदी सर्व समस्यांना सामोरे जात हरभरा काढणी व मळणी सोबतच सुरू आहेत. परिणामी गावे निर्मनुष्य दिसत आहेत. मजुरांच्या टंचाईमुळे व अवकाळीच्या भीतीने काढणी सुरू झाल्याने मजुरीत वाढ देऊन खूश करण्यात येत आहे. हातातोंडाशी आलेले पीक पदरात घेण्याची लगबग दिसून येत आहे.
अवकाळीची धास्ती व मजुरांच्या तुटवड्यांमुळे शेतात दिवसरात्र जागून खळे व काढणी करण्याची धावपळ वाढली आहे. पिकेही जोमात आली होती म्हणून काढणीस वेळ लागत आहे. सर्वत्र मजुरांची टंचाई जाणवत आहे. तसेच सध्या भावही चांगला मिळालेला दिसून येत आहे. - बळिराम इंगळे, शेतकरी, आपेगाव
===Photopath===
280221\282_bed_18_28022021_14.jpg
===Caption===
आपेगाव परिसरात हरभरा काढणीची लगबग दिसत आहे.