वाळवण पदार्थ बनविण्याची महिलांची लगबग - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:29 AM2021-04-03T04:29:58+5:302021-04-03T04:29:58+5:30

पुरूषोत्तम करवा माजलगाव : उन्हाळा सुरू होताच ग्रामीण भागात महिलांची उन्हाळी वाळवण पदार्थ बनविण्याची लगबग सुरू झाली असून घराघरात ...

About women making dry goods - A | वाळवण पदार्थ बनविण्याची महिलांची लगबग - A

वाळवण पदार्थ बनविण्याची महिलांची लगबग - A

Next

पुरूषोत्तम करवा

माजलगाव : उन्हाळा सुरू होताच ग्रामीण भागात महिलांची उन्हाळी वाळवण पदार्थ बनविण्याची लगबग सुरू झाली असून घराघरात पापड्या, कुरड्या, शेवया, खारवड्या हे उन्हाळी पदार्थ तयार करण्यात येत आहेत.

मराठवाड्याच्या ग्रामीण भागात दरवर्षी उन्हाळा सुरू होताच शेतातील पिकांच्या आलेल्या धान्यापासून त्यातही गहू, ज्वारी, तांदूळ, बाजरी या धान्यांपासून म्हणजे गव्हापासून शेवया-कुरडई , बाजरीच्या खारवड्या-पापड्या, तांदळापासून पापड्या- खीचे,उडीद डाळीचे पापड, बटाटा चिप्स-चकल्या, साबुदाणा चिप्स-चकल्या आदी वाळवून ठेवण्याचे पदार्थ तयार करण्यात येतात. तर ज्याच्या घरात आंब्याला कैऱ्या आल्या आहेत अशा घरी व जे खवय्ये आहेत ते बाहेरून आंबे विकत आणून घरात लोणचे तयार करून घेतात. वर्षभर घरात वेगवेगळ्या सणवारावेळी तसेच एकादशी, महाशिवरात्री, चतुर्थी व सर्व उपवासासाठी हे पदार्थ तळून खाण्यात येतात. दुपारी-सायंकाळी बाजरीच्या तळलेल्या खारवड्यांसोबत शेंगदाणे व कांदा खाण्याची लज्जतच न्यारी असते. आता उन्हाळा चांगलाच जाणवत असून त्याबरोबरच घराघरात हे वर्षभरासाठीचे वाळवण पदार्थ बनविण्यासाठी महिलांची लगबग सुरू आहे. शेतातून आलेला धान्याचा माल व नोकरदारांनी किराणा दुकानांतून आणलेले गहू,ज्वारी, बाजरी,तांदूळ,डाळी दळून आणून महिला या उन्हाळी वाळवून ठेवायचे पदार्थ बनविण्यासाठी कामाला लागल्याचे चित्र दिसत आहे. या कामासाठी घरातील महिला, मुली, शेजारच्या मैत्रिणी व लॉकडाऊन मुळे घरात बसलेली पुरुष मंडळी असे सर्वजण मिळून हे पदार्थ तयार करण्यासाठी मदत करतात.

पीठ चुलीवर शिजवून घेऊन गरमागरम पापड्या-खारवाड्या घालणे, सोजीची कणीक तिंबून घेऊन लगोलग त्याच्या शेवया करण्यासाठी मशीनमध्ये कणीक टाकून तो चरखा फिरवणे हे मोठे कष्टाचे काम असते. मग या चरख्यातून शेवया बाहेर येतात. त्याचे चवंगे मशीनमधून काढून ते कपड्यावर वाळवण्यात येतात. आता शेवया मशीन आली असली तरी हातांवर तयार केलेल्या शेवयांची चव वेगळीच लागते. म्हणून महिला देखील घरी पदार्थ करण्याला प्राधान्य देतात व एकमेकींना या कामात मिळून मदत करतात. सध्या ऐन उन्हात ही कामे घराच्या अंगणात, छतावर सुरू असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

मागील वर्षी कोरोनाची सुरुवात झाल्याने लाॅकडाऊन झाले होते. त्यावेळी कोणीही कोणाच्या घरी जात नव्हते. त्यामुळे गेल्यावर्षी उन्हाळ्यातील कोणतेच काम केले नव्हते. परंतु या वेळी कोरोनाचा काळ असतांनाही सोशल डिस्टन्सिंग ठेवत आम्ही उन्हाळ्यातील कामे करत आहोत.

-जया विजय देशमुख

===Photopath===

010421\5902purusttam karva_img-20210401-wa0040_14.jpg

Web Title: About women making dry goods - A

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.