हजेरी पुस्तकात नोंदविली कर्मचाऱ्यांची गैरहजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:35 AM2021-05-18T04:35:09+5:302021-05-18T04:35:09+5:30

जातेगाव : गेवराई तालुक्यातील जातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रास गटविकास अधिकारी अनिरुद्ध सानप यांनी सोमवारी अचानक भेट दिली. यावेळी चार ...

Absence of staff recorded in the attendance book | हजेरी पुस्तकात नोंदविली कर्मचाऱ्यांची गैरहजेरी

हजेरी पुस्तकात नोंदविली कर्मचाऱ्यांची गैरहजेरी

Next

जातेगाव : गेवराई तालुक्यातील जातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रास गटविकास अधिकारी अनिरुद्ध सानप यांनी सोमवारी अचानक भेट दिली. यावेळी चार आरोग्य कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती होती. दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी एकही डॉक्टर उपस्थित नव्हते. यावेळी सानप यांनी कर्मचाऱ्यांचे हजेरी पुस्तक तपासून त्यांची गैरहजेरी नोंदविली.

आरोग्य केंद्रात अँटिजन किट नसल्याचे दिसून आले. अँटिजन किट जिल्ह्याच्या ठिकाणी उपलब्ध असूनदेखील आरोग्य कर्मचारी किट आणण्यासाठी जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असल्याचे निदर्शनास आले. सरपंच सतीश चव्हाण, ग्रामसेवक पाडोळे यांच्याशी झूम ॲपवर गटविकास अधिकारी सानप यांनी संवाद साधला. यावेळी सरपंच सतीश चव्हाण अनेक समस्या मांडल्या. आरोग्य केंद्रात अँटिजन किटचा अभाव असल्याने गेल्या १० दिवसांपासून स्वॅब घेणे बंद झाले आहे, असेही सरपंच चव्हाण यांनी सांगितले. प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रभारी डॉ. अवद्युत शेख यावेळी उपस्थित होते.

सानप यांनी गैरहजर असलेल्या डॉ. पल्लवी जोडपे यांच्याशी संपर्क करून त्यांनाही समज दिली. कोरोनाचा आणीबाणीचा काळ आहे. सतर्कतेने काम करा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

===Photopath===

170521\img_20210517_131338_14.jpg

Web Title: Absence of staff recorded in the attendance book

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.