कार्यशाळेला गैरहजर, ८ बीईओंवर कारवाईचा बडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 11:50 PM2019-09-03T23:50:47+5:302019-09-03T23:51:32+5:30
स्वच्छ भारत अभियानांतर्गत राष्टÑीय पातळीवर स्वच्छता सर्वेक्षण स्पर्धा तसेच इतर उपक्रम सुरु आहेत. या अभियानांतर्गत गावपातळीवर करावयाच्या उपाय योेजनेबाबत घेण्यात आलेल्या कार्यशाळेकडे पाठ फिरविणाऱ्या ८ गटशिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
बीड : स्वच्छ भारत अभियानांतर्गत राष्टÑीय पातळीवर स्वच्छता सर्वेक्षण स्पर्धा तसेच इतर उपक्रम सुरु आहेत. या अभियानांतर्गत गावपातळीवर करावयाच्या उपाय योेजनेबाबत घेण्यात आलेल्या कार्यशाळेकडे पाठ फिरविणाऱ्या ८ गटशिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
केंद्र शासनाच्या वतीने राष्टÑीय पातळीवर स्वच्छता दर्पण स्पर्धा सुरु झाली. या स्पर्धेत १३६४ गावांचा सहभाग होता. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिका-यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात २३ आॅगस्ट रोजी राष्टÑीय स्वच्छता सर्वेक्षण स्पर्धा सुरु झाली. यावेळी सर्व विभागांना स्पर्धेच्या अनुषंगाने सूचना देण्यात आल्या होत्या. याच दिवशी जिलहाभरात शिक्षण विभागाची कार्यशाळा असल्याने व त्यासाठी जवळपास ९ ते १० हजार शिक्षक येणार असल्याने गटशिक्षणाधिका-यांनी त्यांना राष्टÑीय स्वच्छता सर्वेक्षण स्पर्धेबाबत माहिती देऊन ग्रामस्थांना त्यांचे मत अॅपद्वारे नोंदविण्यासाठी पाठपुरावा, जगजागृती करावी असे सुचविले होते. मात्र विद्यार्थी व पालकांपर्यंत हा संदेश शिक्षकांमार्फत पोहचविण्यात गटशिक्षणाधिकारी कमी पडले. स्वच्छतेच्या अॅपवर केवळ दोन हजार मते नोंदल्याची बाब समोर आली. परिणामी बीडचा राज्यातील ८ पर्यंत रॅँक घसरला. यातच संत गाडगे बाबा हागणदारीमुक्त ग्रामपंचायत पडताळणी टप्पा - २ सुरु झाला आहे. या विविध कार्यक्रमांच्या अनुषंगाने प्रभावी अंमलबजावणीसाठी २८ आॅगस्ट रोजी कार्यशाळेचे आयोजन केले होते.
गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, आरोग्य, शिक्षण, पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी यांच्यासह यंत्रणेतील गटसमन्वयक, प्रेरक कर्मचाºयांसाठी ही कार्यशाळा होती. या कार्यशाळेत तालुका पातळीवर शिक्षण विभागाचा महत्वाचा घटक असलेल्या गटशिक्षणाधिका-यांचीच उदासिनता दिसून आली
बीडीओंनाही घेतले फैलावर
मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी भेट दिली तेव्हा कार्यशाळेत केवळ बीड, अंबाजोगाई आणि वडवणी येथील गटशिक्षणाधिकारी उपस्थित असल्याचे दिसून आले.
इतर ८ गटशिक्षणाधिका-यांनी मात्र दुपारच्या सत्रानंतर दांडी मारल्याने तत्काळ कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार स्वच्छ भारत मिशन विभागामार्फत ८ गैरहजर गटशिक्षणाधिका-यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये याबाबत विचारणा केली आहे.
विविध उपक्रमांतील कामकाज, प्रगती तसेच इतर पूरक विषयांबाबत ढिलाई दिसल्याने गटविकास अधिका-यांनाही सीईओंनी फैलावर घेतले.