मोठी कारवाई! लघुपाटबंधारे विभागाचे दोन लिपिक एसीबीचीच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 07:23 PM2023-04-24T19:23:11+5:302023-04-24T19:25:02+5:30

आष्टी येथील लघु पाटबंधारे उपविभागाच्या कार्यालयात कारवाई करण्यात आली

ACB big action! Two clerks of Minor Irrigation Department nabbed for taking bribe | मोठी कारवाई! लघुपाटबंधारे विभागाचे दोन लिपिक एसीबीचीच्या जाळ्यात

मोठी कारवाई! लघुपाटबंधारे विभागाचे दोन लिपिक एसीबीचीच्या जाळ्यात

googlenewsNext

- नितीन कांबळे
कडा -
प्रवास भत्याचा धनादेश मंजूर करण्यासाठी फोनवर एका लिपीकाने लाच मागितली तर धनादेश प्रदान करण्यासाठी दुसर्‍या लिपीकाने पंचासमक्ष लाच स्विकारली याप्रकरणी आष्टी येथील लघुपाट बंधारे विभागातील दोघाजणांवर एसीबीने आज दुपारी कारवाई केली. आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लिपिक कुंदन अशोक गायकवाड आणि वरिष्ठ लिपिक पोपट श्रीधर गरुड असे लाचखोर लिपीकांची नावे आहेत.

तक्रारदाराचा प्रवास भत्ता देयकाचा 19 हजार 410 रुपयांचा धनादेश मंजूर केल्याचा मोबदला म्हणून कुंदन अशोक गायकवाड ( प्रथम लिपिक, मध्यम प्रकल्प कार्यकारी अभियंता कार्यालय, उस्मानाबाद)  आणि पोपट श्रीधर गरुड ( वरिष्ठ लिपिक, लघु पाटबंधारे उप विभाग आष्टी, जि बीड ( वर्ग -३) यांनी फोनवर २ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागास संपर्क केला. दरम्यान, पोपट चौधरी याने तक्रारदार यांना मंजूर झालेला  १९ हजार ४१० रुपयांचा धनादेश त्यांना प्रदान करण्यासाठी स्वतः व कुंदन गायकवाड यासे मिळून एकत्रित असे २० टक्के प्रमाणे ३ हजार ८८२ रुपयांची मागणी करून ३ हजार ८८० रुपये स्विकारण्याचे मान्य केले.

आज एसीबीने आष्टी येथील लघु पाटबंधारे उपविभागाच्या कार्यालयात सापळा लावला. ३ हजार ८८० रुपयांची लाच स्विकारताच एसीबी पथकाने पोपट गरुड यास रंगेहाथ पकडले. याप्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू आहे. ही कारवाई  संदीप आटोळे पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद, विशाल खांबे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक शंकर शिंदे, पोलीस अंमलदार सुरेश सांगळे, भारत गारदे, संतोष राठोड , अमोल खरसाडे,  गणेश मेहेत्रे यांनी केली.

Web Title: ACB big action! Two clerks of Minor Irrigation Department nabbed for taking bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.