महावितरणच्या दोन कर्मचाऱ्यांना एसीबीचा शॉक; १३ हजारांची लाच घेताच बेड्या

By सोमनाथ खताळ | Published: April 5, 2023 05:19 PM2023-04-05T17:19:39+5:302023-04-05T17:19:58+5:30

जास्त बिल न देण्यासाठी महावितरणच्या दोन कर्मचाऱ्यांनी ४० हजार रूपयांची लाच मागितली.

ACB shocks two Mahavitaran employees of Majalgaon; arrested after taking a bribe of 13 thousand | महावितरणच्या दोन कर्मचाऱ्यांना एसीबीचा शॉक; १३ हजारांची लाच घेताच बेड्या

महावितरणच्या दोन कर्मचाऱ्यांना एसीबीचा शॉक; १३ हजारांची लाच घेताच बेड्या

googlenewsNext

माजलगाव (बीड) : जुने मीटर बदलून नवीन मिटर बसवले बाबतचे सांगून जास्त बिल न देण्यासाठी महावितरणच्या दोन कर्मचाऱ्यांनी ४० हजार रूपयांची लाच मागितली. तडजोडीअंती १३ हजार रूपये घेताच बीडच्यालाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना बेड्या ठोकल्या. ही कारवाई बुधवारी दुपारी माजलगाव शहरात केली. 

एसीबीने महावितरणच्या कर्मचाऱ्यांना कारवाई करून शॉक दिल्याने खळबळ उडाली आहे. रामा बन्सीधर लोखंडे (वय ३८ वर्ष, कनिष्ठ लिपिक, म.रा.वि.वि. कंपनी. उपविभाग माजलगाव) व ज्ञानेश्वर जगन्नाथ पांचाळ (वय ३० वर्षे,कनिष्ठ सहाय्यक, माजलगाव) अशी आरोपींची नावे आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर अधीक्षक विशाल खांबे, उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल धस, भरत गारदे, अविनाश गवळी, संतोष राठोड, गणेश म्हेत्रे आदींनी केली आहे.

Web Title: ACB shocks two Mahavitaran employees of Majalgaon; arrested after taking a bribe of 13 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.