बीडमध्ये पुन्हा एसीबीचा ट्रॅप; केजच्या तहसीलदारासह कोतवाल जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 10:31 PM2024-05-31T22:31:23+5:302024-05-31T22:31:55+5:30

मच्छिंद्र माने हा कोतवाल असून पाटील याच्यासाठी वसूलीचे काम करतो.

ACBs trap again in Bead Kotwal to the Tehsildar of Cage | बीडमध्ये पुन्हा एसीबीचा ट्रॅप; केजच्या तहसीलदारासह कोतवाल जाळ्यात

बीडमध्ये पुन्हा एसीबीचा ट्रॅप; केजच्या तहसीलदारासह कोतवाल जाळ्यात

सोमनाथ खताळ, बीड : रेशन दुकानावर कारवाई न करण्यासाठी २० हजार रूपयांची लाच घेताना केजमधील कोतवाल एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. तसेच केजचा तहसीलदार अभिजित पाटील हा देखील यात आरोपी असून तो फरार झाला आहे.

ही कारवाई धाराशिव येथील पथकाने शुक्रवारी रात्री १० वाजता केली. दरम्यान, बीड जिल्ह्यातील लाचखोरीचे सत्र सूरूच आहे. एसीबीकडूनही कारवायांचा धडाका चालूच आहे. अभिजित पाटील हा केजचा तहसीलदार आहे. मच्छिंद्र माने हा कोतवाल असून पाटील याच्यासाठी वसूलीचे काम करतो.

केज तालुक्यातीलच एका रेशन दुकानदारावर कारवाई प्रस्तावित होती. ती न करण्यासाठी तहसीलदार पाटील याने २० हजारांची लाच मागितली होती. हीच लाच कोतवाल माने याने स्विकारली. परंतू तहसीलदार पाटील हा फरार झाला आहे. धाराशिव येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने आठवड्यातील दुसरी कारवाई बीड जिल्ह्यात केली आहे.

Web Title: ACBs trap again in Bead Kotwal to the Tehsildar of Cage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Beedबीड