पावसाळ्याच्या तोंडावर शेतीच्या मशागतीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:25 AM2021-05-28T04:25:09+5:302021-05-28T04:25:09+5:30

माजलगाव : तालुक्यात पावसाळ्याच्या तोंडावर शेतकरीवर्गातून शेतातील मशागतीला वेग आला आहे. सध्या शेतकरी नांगरटीबरोबरच रूटरचे काम प्रगतिपथावर आहे ...

Accelerate agricultural cultivation in the face of rains | पावसाळ्याच्या तोंडावर शेतीच्या मशागतीला वेग

पावसाळ्याच्या तोंडावर शेतीच्या मशागतीला वेग

Next

माजलगाव : तालुक्यात पावसाळ्याच्या तोंडावर शेतकरीवर्गातून शेतातील मशागतीला वेग आला आहे. सध्या शेतकरी नांगरटीबरोबरच रूटरचे काम प्रगतिपथावर आहे तर शेतमशागतीला बैलापेक्षा ट्रॅक्टरचा वापर करण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे.

यावर्षी पाऊस वेळेवर पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकरीवर्गात शेती मशागतींना चांगलाच वेग आल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी सध्या शेतात नांगरट, रूटरसह काशा व पळाट्या वेचणीचे काम जोरदार सुरू आहे. मागील काही वर्षांत सांभाळण्याचा खर्च वाढू लागल्याने तसेच इतर आर्थिक कारणांमुळे अनेक शेतकऱ्यांनी पशुधन विक्रीस काढले. ज्यांच्याजवळ बैलजोडी आहे, त्यापैकी काही मोजकेच शेतकरी नांगरटीची कामे घेतात. पशुधनाची संख्या कमी झाल्याने शेतकरी शेती मशागतीसाठी खर्चिक असतानाही ट्रॅक्टरद्वारे मशागत करत आहेत.

गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी नांगरट व रूटर शेतात मारण्यासाठी एकरी दोनशे ते तीनशे रुपये एकरी भाव वाढविण्यात आले आहेत. गेल्यावर्षी नांगरटीसाठी पंधराशे रुपये लागत होते त्यास यावर्षी अठराशे रुपये लागत आहेत. रूटर मारण्यासाठी गेल्यावर्षी एक हजार रुपये लागत होते, यावर्षी बाराशे रुपये लागत असल्याचे नागडगावचे शेतकरी बाळू बजाज यांनी सांगितले. तालुक्यात यंदा ७८ हजार ९०० हेक्टरांत खरिपाचा पेरा होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील मशागतीचे काम पूर्णत्वाकडे नेले असून आता त्याचे डोळे पावसाकडे लागले आहेत.

अपेक्षित पेरा - हेक्टर

कापूस - ३०,०००

सोयाबीन - २४ ०००

ऊस - १७,०००

तूर - ४, ५००

बाजरी, मूग, उडिद - ३,४००

-------

मशागत एकरी ३०० रुपये महाग झाली

ट्रॅक्टरद्वारे - आधीचे दर - सध्याचे दर एकरी

नांगरट - १५०० - १८००

रूटर - १००० - १२००

नांगरटविना रूटर १४०० - १७००

===Photopath===

270521\img_20210424_120438_14.jpg

Web Title: Accelerate agricultural cultivation in the face of rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.