शेती कामांना वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:12 AM2021-08-02T04:12:29+5:302021-08-02T04:12:29+5:30
..... मंदिरात प्रवेश सुरु करावा अंबाजोगाई : कोरोना संकटामुळे मंदिरामध्ये भाविकांना जाण्यास प्रतिबंध आहे. आता संकट काही प्रमाणात कमी ...
.....
मंदिरात प्रवेश सुरु करावा
अंबाजोगाई : कोरोना संकटामुळे मंदिरामध्ये भाविकांना जाण्यास प्रतिबंध आहे. आता संकट काही प्रमाणात कमी झाल्यामुळे भाविकांसाठी मंदिर सुरु करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मधुकर नागरगोजे यांच्या वतीने करण्यात आली आहे.
---------------------
प्रवाशांची ऑटोला पसंती
अंबाजोगाई : सार्वजनिक वाहतूक सुरु झाली आहे. मात्र, अद्यापही काही गावात बस जातच नसल्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनांशिवाय पर्याय नाही. त्यामुळे बहुतांश प्रवाशी ऑटोने प्रवास करीत आहे.
----------–------------
संगणक प्रशिक्षण देण्याची मागणी
अंबाजोगाई : संगणकीय साक्षरता वाढविण्यासाठी पूर्वी शासनातर्फे मोफत संगणकीय प्रशिक्षण देण्यात येत होते. मात्र काही कालावधीपासून आता हे प्रशिक्षण बंद करण्यात आले आहे. परिणामी ग्रामीण भागातील नागरिक संगणकीय साक्षरतेपासून दूर आहेत. त्यामुळे संगणक प्रशिक्षण शिबिर राबविण्याची मागणी आहे.
....
मोबाईल दुरुस्तीचे प्रशिक्षण राबवावे
अंबाजोगाई : कोरोनाने अनेक जण बेरोजगार झाले आहेत. नोकर भरतीही बंद आहे. त्यामुळे बेरोजगारांच्या हाताला काम देण्याच्या अनुषंगाने मोबाईल दुरुस्तीचे प्रशिक्षण राबविण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रा. संतोष मोहिते यांनी केली आहे.