शेती कामांना आला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:24 AM2021-07-18T04:24:24+5:302021-07-18T04:24:24+5:30

जास्वंदाच्या झाडाला लालबुंद फुलांचा बहर शिरूर कासार : पाऊस पडला आणि सर्वत्र चैतन्य पसरले. शेतशिवारासह परस बागेत असणाऱ्या फुलझाडांनाही ...

Accelerated agricultural work | शेती कामांना आला वेग

शेती कामांना आला वेग

Next

जास्वंदाच्या झाडाला लालबुंद फुलांचा बहर

शिरूर कासार : पाऊस पडला आणि सर्वत्र चैतन्य पसरले. शेतशिवारासह परस बागेत असणाऱ्या फुलझाडांनाही वेगवेगळे रंग चढले असून, जास्वंदाच्या झाडाला लालबुंद फुलांचा बहर आल्याचे जागोजागी दिसून येत आहे. हे दृष्य पाहताच प्रसन्नता जाणवते.

फोटो

वीक एण्डचा लाॅकडाऊन, नगरपंचायतचा फेरफटका

शिरूर कासार : शनिवार, रविवार दोन दिवस संपूर्ण लाॅकडाऊन असल्याने नियमांची अंमलबजावणी होते किंवा नाही, यासाठी नगरपंचायत कर्मचारी शहरात फेरफटका मारत असल्याचे शनिवारी दिसून आले. कोरोना नियमावलीचे व दिलेल्या वेळेचे तंतोतंत पालन करा, अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल, असे आवाहनही घंटागाडीच्या माध्यमातून केले जात आहे. वेळेचं बंधन न पाळल्यास दंडात्मक कारवाई अटळ असल्याचे मुख्याधिकारी किशोर सानप यांनी सांगितले.

सेवेसाठी रुग्णवाहिका दाखल

शिरूर कासार : कोरोना काळात रुग्णांना दवाखान्यापर्यंत नेण्यासाठी वाहनधारकांकडून होणारी अडवणूक व आडमाप भाडे घेत असल्याचे लक्षात आल्यानंतर रुग्णांची गरजेच्या वेळी अडवणूक व पिळवणूक होऊ नये, या हेतूने येथील गॅस एजन्सीचे राम कांबळे यांनी आदर्श पत्रकार संघाच्या संकल्पनेतून नवी रुग्णवाहिका आणून सर्वसामान्य नागरिकांसाठी उपयोगितेचे पाऊल टाकले आहे. रुग्णवाहिकेची यथावत पूजा शुक्रवारी सिद्धेश्वर संस्थानचे महंत स्वामी विवेकानंद शास्त्री यांनी केली. यावेळी सर्व पत्रकार, तसेच उपनगराध्यक्ष प्रकाश देसरडा, बबनराव चौधरी, डॉ. गणेश देशपांडे, अंगद पानसंबळ आदी उपस्थित होते.

फोटो

Web Title: Accelerated agricultural work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.