लग्नासाठी कपिलधारला जाणाऱ्या कारचा अपघात, नवरदेवाच्या भावासह 4 ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2019 03:24 PM2019-02-24T15:24:42+5:302019-02-24T15:25:41+5:30

मृतांमध्ये नवरदेवाच्या भावासह दोन मेव्हण्यांचा समावेश

Accident of car going to Kapilha for marriage, 4 killed with Nawarda's brother | लग्नासाठी कपिलधारला जाणाऱ्या कारचा अपघात, नवरदेवाच्या भावासह 4 ठार

लग्नासाठी कपिलधारला जाणाऱ्या कारचा अपघात, नवरदेवाच्या भावासह 4 ठार

Next

बीड : लग्न सोहळ्यासाठी कपिलधारकडे जाणारी कार आणि उस्मानाबादकडून येणाºया ट्रकचा समोरासमोर अपघात होऊन नवरदेवाच्या भावासह चार जण ठार झाले. रविवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बीडपासून जवळच असलेल्या पाली परिसरातील बिंदुसरा तलावानजीक ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार अंबाजोगाई तालुक्यातील बोरी सावरगाव येथील तेजस गुजर याचा भाऊ कुंभेश याचे कपिलधार येथे लग्न होते. त्यानिमित्त तेजससोबत मेहुणे सौरभ अरुण लोहारे (रा. लातूर), मंगेश मल्लिकार्जुन कुंकूकरी (ता. बार्शी, सोलापूर), अक्षय रामलिंग गाढवे (रा. धानोरा, ता. अंबाजोगाई) तिघे बीड येथे काही कामानिमित्त आले होते. बीडकडून कपिलधारकडे कारमधून जात असताना बिंदुसरा तलावानजीक समोरुन आलेल्या ट्रक आणि कारचा समोरासमोर अपघात झाला. यात तेजस गुजर, सौरभ लोहारे, मंगेश कुंकूकरी, अक्षय गाडवे हे ठार झाले, तर कारमधील शुभम दत्तात्रय उंबरे (रा. वाणेवाडी, ता. उस्मानाबाद) हा जखमी झाला आहे. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. 

अपघातानंतर परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू  केले. पोलीस उपअधीक्षक सुधीर खिरडकर, ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ, महामार्ग पोलीस विभागाचे पोलीस निरीक्षक भास्कर नवले, तसेच ग्रामीण ठाणे  व महामार्ग पोलीस कर्मचाºयांनी घटनास्थळी जखमींना मदत करून वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, जिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी झाली होती. मयतांच्या नातेवाईकांनी आक्रोश केला, तर या घटनेची माहिती मिळताच नवरदेवाला मानसिक धक्का बसल्याचे समजते.
 

Web Title: Accident of car going to Kapilha for marriage, 4 killed with Nawarda's brother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.