'पिक नुकसानीचे पंचनामे करा'; कुंभेफळ येथे शेतकऱ्यांचा रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 05:56 PM2019-09-02T17:56:14+5:302019-09-02T18:13:32+5:30

हेक्टरी एक लाख रुपयांच्या मदतीची केली मागणी 

'Accumulate crop damage'; Farmers' agitaion at Kumbhefal | 'पिक नुकसानीचे पंचनामे करा'; कुंभेफळ येथे शेतकऱ्यांचा रास्तारोको

'पिक नुकसानीचे पंचनामे करा'; कुंभेफळ येथे शेतकऱ्यांचा रास्तारोको

googlenewsNext
ठळक मुद्देतालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्याने पिके करपली

केज : तालुक्यातील कुंभेफळ येथे परिसरातील पंधरा गावच्या शेतकऱ्यांनी पिकांचे पंचनामे करून हेक्‍टरी एक लाख रुपये मदत देण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी बैलगाड्या रस्त्यावर आडव्या लावल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक खोळंबली होती. 

अत्यल्प झालेल्या पावसामुळे तालुक्यातील पिके पावसाअभावी वाळून गेल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. करपलेल्या पिकांचे पंचनामे करून हेक्टरी १ लाख रुपये मदत द्यावी, खरीप हंगाम 2017, रब्बी हंगाम 2018 चा पिक विमा तात्काळ देण्यात यावा, पशुधनासाठी दावणीला चारा उपलब्ध करून द्यावा आदी मागण्यांसाठी तालुक्यातील १५ गावच्या शेतकऱ्यांनी एक तास रास्तारोको आंदोलन केले. आंदोलनात कुंभेफळ, बंकरांजा, होळ ,चंदनसावरगाव ,सोनिजवळा, भाटुंबा, पिसेगाव ,जवळबन ,जानेगाव, ढाकेफळ, सारणी (आ) आनंदगाव (सा) व परिसरातील शेकडो शेतकऱ्यांचा सहभाग होता. मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार सचिन देशपांडे यांना देण्यात आले. यावेळी युसुफ वडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद झोटे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

आमदार ठोंबरे यांनी केली मागणी 
पिके पावसाअभावी करपून गेल्याने पिकांचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश यंत्रणेला देण्यात यावेत, चारा छावण्या सुरु करण्यात याव्यात, तसेच सन 2019- 20 खरीप हंगामातील पीकविमा तात्काळ देण्यात यावा अशी मागणी आमदार संगीता ठोंबरे यांनी ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे केली आहे.
 

Web Title: 'Accumulate crop damage'; Farmers' agitaion at Kumbhefal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.