अत्याचार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:38 AM2021-09-23T04:38:26+5:302021-09-23T04:38:26+5:30

बीड : अल्पवयीन मुलीवर तीन नराधमांनी सामूहिक अत्याचार केल्याची घृणास्पद घटना परभणी जिल्ह्यातील एका तांड्यावर नुकतीच उघडकीस आली. यातील ...

Accused in atrocities should be given death penalty | अत्याचार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी

अत्याचार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी

Next

बीड : अल्पवयीन मुलीवर तीन नराधमांनी सामूहिक अत्याचार केल्याची घृणास्पद घटना परभणी जिल्ह्यातील एका तांड्यावर नुकतीच उघडकीस आली. यातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्याकडे निवेदनाद्वारे २२ सप्टेंबर रोजी करण्यात आली.

महिला अत्याचाराचा प्रश्न ऐरणीवर आलेला असताना परभणी जिल्ह्यात तांड्यावरील अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना समोर आली. याप्रकरणी गुन्हा नोंद आहे. आरोपींना त्वरित अटक करुन पीडितेला न्याय द्यावा, खटला जलदगती न्यायालयात चालवावा, पीडित कुटुंबाला संरक्षण द्यावे, सरकारी वकील म्हणून ॲड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, आदी मागण्या करण्यात आल्या.

बंजारा परिषदेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत गृहमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. यावेळी माजी जि.प. सदस्य प्रा. पी. टी. चव्हाण, बाजीराव राठोड, सुरेश पवार, अमर राठोड, रोहिदास राठोड, ज्ञानेशवर राठोड, राजू राठोड उपस्थित होते.

Web Title: Accused in atrocities should be given death penalty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.