अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी आरोपीला सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 12:23 AM2019-02-27T00:23:18+5:302019-02-27T00:24:07+5:30

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा येथील सातवे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्या. एन. एस. शेख यांच्या न्यायालयाने सुनावली.

The accused has been arrested in the case of molestation of a minor girl | अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी आरोपीला सक्तमजुरी

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी आरोपीला सक्तमजुरी

Next

बीड : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा येथील सातवे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्या. एन. एस. शेख यांच्या न्यायालयाने सुनावली.
अधिक माहिती अशी की, ९ आॅक्टोबर २०१६ रोजी बीड तालुक्यातील तळेगाव शिवारात पीडित मुलगी तिच्या शेतातील बोअरची मोटर चालू करण्यासाठी गेली असता तिला नदीकडे ओढून विनयभंग केल्याची घटना घडली. या प्रकारानंतर पीडित मुलीने अंगद लाखे नामक व्यक्तीकडे जात मदत मागितली. अंगद लाखे यांनी तिला घरी सोडले व तिचे आजी, आजोबा, आई आणि चुलते यांना घटनेची माहिती दिली. त्याच दिवशी रात्री आरोपीविरुद्ध पीडित मुलीच्या फिर्यादीवरुन बप्पाजी उर्फ बप्पा बाबुराव बागलाने विरुद्ध भादंवि कलम ३५४, ३५४ (अ) व कलम ८ आणि १२ अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला. बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक बी.एस.ढगारे यांनी या प्रकरणाचा तपास करुन आरोपींविरु द्ध दोषारोपपत्र दाखल केले. हे प्रकरण विशेष न्यायालयात वर्ग करण्यात आले होते. या प्रकरणाची सुनावणी सातवे अतिरिक्त जिल्हा व सत्र यांच्या न्यायालयात झाली. आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यासाठी सरकार पक्षाच्या वतीने पाच साक्षीदार तपासण्यात आले. यात पीडित मुलीची, तिच्या आईची तसेच तपासी अंमलदाराची साक्ष, कागदोपत्री पुराव्याचे अवलोकन करून तसेच जिल्हा सहाय्यक सरकारी वकील राम बिरंगळ यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने बाप्पा बाबुराव बागलाने यास कलम ३५४ व कलाम ३५४ (अ) आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार दोषी ठरवून पाच वर्षे सक्तमजुरी तसेच सहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारतर्फे जिल्हा सहाय्यक सरकारी वकील राम बिरंगळ यांनी काम पाहिले. सदर प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून उपनिरीक्षक मोरे व हेकॉ जाधव यांनी मदत केली .

Web Title: The accused has been arrested in the case of molestation of a minor girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.