अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी आरोपीस १० वर्षे सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2022 04:51 PM2022-03-14T16:51:40+5:302022-03-14T16:53:18+5:30
आरोपी विवाहित असून त्याने अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन वारंवार अत्याचार केला
अंबाजोगाई-:अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस दोषी ठरवत १० वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड. अशी शिक्षा येथील अप्पर सत्र न्यायाधीश सुप्रिया सापटनेकर यांनी सोमवारी ठोठावली. अशोक मारुती सरवदे, रा. साबळा, ता. केज.असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
या घटनेची माहिती अशी की या प्रकरणातील आरोपी अशोक मारुती सरवदे, रा. साबळा, ता. केज. याने अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवत,तिला फुस लावून पळवून नेले होते. म्हणुन आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता.या प्रकरणात पोलीस तपासा नंतर आरोपीस या प्रकरणात न्यायालयाने जामीन मंजुर केला होता. आरोपीची जामीनावर सुटका झाल्यानंतर आरोपीने परत पुन्हा पिडीतेस फोन करून लग्नाचे आमिष दाखवून पळवून घेवून गेला.व ते दोघेजण पती-पत्नी प्रमाणे राहू लागले. आरोपी सोबतची ती मुलगी अल्पवयीन आहे हे माहिती असताना सुध्दा आरोपीने तिच्यावर वारंवार बलात्कार केला. विशेष बाब म्हणजे आरोपी हा विवाहीत असून त्याला दोन मुले आहेत. तरी देखील सदरील अल्पवयीन पिडीतेस साबळा, ता. केज येथून पळवून नेले. व अनेकवेळा बलात्कार केला.
या फिर्यादीवरून आरोपी अशोक मारुती सरवदे याच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात दिनांक २८/०९/२०२० रोजी गु.र.नं. 405/2020, कलम ३६३, ३७६, ३७६ (J) (n) भा.द.वी सहकलम ४,६,८,१० बा. लैं. अ.प्र. का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकरणाचा पोलीस तपास होऊन आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोप दाखल करण्यात आले. सदर प्रकरण हे आरोपीस तुरूंगात ठेवूनच चालविण्यात आले. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अँड अशोक कुलकर्णी यांनी सहा साक्षीदार तपासले.व आरोपी विरुद्ध न्यायालयाकडे ठोस पुरावे सादर केले. न्यायालयाने सादर केलेले साक्षीपुरावा व सरकारी वकीलाचा युक्तीवाद ग्राहय धरून आरोपीस दहा वर्ष, व सात वर्ष अशा दोन्ही सक्तमजुरीची शिक्षा आणि पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा न्यायालयाने ठोठावली.
या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अॅड. अशोक कुलकर्णी यांनी काम पाहीले. त्यांना अॅड. आर. एम. ढेले, अॅड. नितीन पुजदेकर यांनी सहकार्य केले.तर पोलीस पैरवी म्हणून बाबुराव सोडगीर , शिवाजी सोनटक्के यांनी मदत केली.