संचारबंदीच्या पहिल्याच दिवशी केजमध्ये १३ जणांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:34 AM2021-04-07T04:34:51+5:302021-04-07T04:34:51+5:30
केज : संपूर्ण राज्यात रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदीचा आदेश असतानाही केज पोलीस ठाणे ...
केज : संपूर्ण राज्यात रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदीचा आदेश असतानाही केज पोलीस ठाणे हद्दीतील काही व्यावसायिकांनी आदेश डावलून दुकाने व व्यवसाय सुरू ठेवला अशा १३ जणांवर केज पोलिसांनी कारवाई केली.
५ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेनंतरही केज पोलीस ठाणे हद्दीतील सय्यद ईर्शाद अली यांंचे चायनिज चिकन हॉटेल, किरण राजाभाऊ खडके, यांचे ऑटो गॅरेज , बाबासाहेब यादव यांचे हॉटेल, शेख फुरखान मुस्ताक यांचे हॉटेल, सलमान अल्लबक्श शेख यांचे हॉटेल, सुरेशकुमार जाट यांचा आईस्क्रीम व्यवसाय , मस्साजोग बसस्थानकाजवळ अशोक घाटुळ यांचे शिवनेरी पान सेंटर, लहु चौरे यांचे गॅरेज, मनोज सूर्यवंशी यांचे हॉटेल कन्हैय्या, अरुण चाटे यांचे हॉटेल, मिनाज कुरेशी शब्बीर कुरेशी यांचे बिर्याणी हॉटेल, शेख महेबुब शेख गुलाब यांचे पान स्टॉल आणि किशनलाल गाडरी यांचा आईस्क्रीम व्यवसाय सुरू होता. या तेरा जणांवर पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या आदेशाने पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे.