चार दिवसात २०९ जणांवर कारवाई; ५५ हजारांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:55 AM2021-05-05T04:55:53+5:302021-05-05T04:55:53+5:30

वडवणी : जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार वडवणी पोलिसांनी चार दिवसात २०९ जणांवर विविध कारणांखाली कारवाई करीत ५ हजार ...

Action against 209 people in four days; A fine of Rs 55,000 was recovered | चार दिवसात २०९ जणांवर कारवाई; ५५ हजारांचा दंड वसूल

चार दिवसात २०९ जणांवर कारवाई; ५५ हजारांचा दंड वसूल

Next

वडवणी : जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार वडवणी पोलिसांनी चार दिवसात २०९ जणांवर विविध कारणांखाली कारवाई करीत ५ हजार १०० रुपयांचा दंड वसूल केला. विनामास्क फिरणारे, कोरोना नियम तसेच मोटार वाहन कायद्याचा भंग करणाऱ्यांविरुद्ध या कारवाया करण्यात आल्या.

तालुक्यातील तब्बल ४८ गावांसाठी एकच पोलीस ठाणे आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून खबरदारीचे आवाहन केले जात असले तरी शहरात व ग्रामीण भागात विना मास्क, विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या दुचाकी वाहनधारकांवर कारवाही करताना अपुऱ्या मनुष्यबळामुळे पोलिसांना कसरत करावी लागत आहे. तरीदेखील वडवणी पोलिसांनी चार दिवसात मोहीम राबवित दंडात्मक कारवाया केल्या. सकाळी ११ वाजेनंतर संचारबंदीच्या काळात विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या वाहनधारकांची चौकशी करत कारवाईचे सत्र चार दिवस सुरू ठेवले. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या दुचाकीस्वारांना चोप देण्यात आला. सपोनि नितीन मिरकर, पोलीस उपनिरीक्षक जयसिंग परदेशी, यांच्या मार्गदर्शनाखाली साहायक पोलीस उपनिरीक्षक एम. डी. शेख, पोलीस नाईक ए. एन. आघाव गंगावणे लखन, एन. आर. ढाकणे, विलास खरात, सी. के. माळी, राम बारगजे, शरिफ शेख यांनी या कारवाया केल्या.

फोटो ओळी : वडवणी येथील बीड परळी हायवेवर पोलीस निरीक्षक नितीन मिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जयसिंग परदेशीसह अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संचारबंदीच्या काळात वाहनांची चौकशी करत दंडात्मक कारवाटा केल्या.

मोटार वाहन कायद्यांतर्गत १४५ वाहनांवर कारवाई - ४२ हजार ३०० रुपये दंड वसूल

विनामास्क फिरणाऱ्या ६४ जणांवर कारवाई - १२ हजार ८०० रुपये दंड वसूल

===Photopath===

040521\rameswar lange_img-20210503-wa0012_14.jpg

Web Title: Action against 209 people in four days; A fine of Rs 55,000 was recovered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.