नियम मोडणाऱ्या २८८९ जणांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:31 AM2021-05-22T04:31:50+5:302021-05-22T04:31:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. या काळात विनाकारण घराबाहेर फिरणारे व विनामास्क फिरणाऱ्या २,८८९ जणांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून ६ लाख ८८ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात २५ मेपर्यंत कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. या काळात नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, मास्कचा वापर करावा, लसीकरणासाठी जाणाऱ्यांनी तसेच रुग्णालयात जाणाऱ्या व्यक्तीने नियम पाळावेत, असे आवाहन प्रशासनाकडून वेळोवेळी करण्यात आले आहे. तर नियमांचे पालन न करणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत आहे. २० मेपासून जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. या दरम्यान एका दिवसात नियमांचे पालन न करणाऱ्या २,८८९ जणांवर कारवाई करत ६ लाख ८८ हजार ९०० रुपयांचा दंड प्रशासनाने वसूल केला आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या आता कमी होत असून, सर्वांनी नियमांचे पालन करावे व विनाकारण बाहेर फिरू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.