वीज चोरी करणाऱ्या २५० जणांविरूद्ध कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 12:11 AM2019-11-09T00:11:28+5:302019-11-09T00:12:02+5:30
माजलगाव तालुक्यातील गंगामसला, मोठेवाडी, खरात आडगाव या तीन ठिकाणी आकडे टाकून वीज चोरी करणा-या जवळपास २५० जणांविरूध्द कारवाई केली आहे.
माजलगाव : माजलगाव शहरासह तालुक्यामध्ये वीजचोरीचे प्रमाण वरचेवर वाढत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वीजचोरी होत आहे. ही वीज चोरी रोखण्यासाठी महावितरण माजलगावच्या वतीने शुक्र वारी सकाळपासून माजलगाव तालुक्यातील गंगामसला, मोठेवाडी, खरात आडगाव या तीन ठिकाणी आकडे टाकून वीज चोरी करणा-या जवळपास २५० जणांविरूध्द कारवाई केली आहे.
माजलगाव शहराची लोकसंख्या ही जवळपास लाखाच्या घरात जाते. त्याचबरोबर छोटेमोठे व्यवसाय ही हजाराजवळ आहेत. यामुळे विजेशिवाय एकही व्यवसाय असो वा घरगुती हा विजेशिवाय चालूच शकत नाही. एवढी मोठी लोकसंख्या अन एवढे मोठे व्यवसाय असताना देखील केवळ घरगुती, व्यवसाय, जिनींग आदींना फक्त ६ हजार ५०० वीज ग्राहक आहेत. तालुक्यात देखील असे मिळून १२ हजार ५०० वीज ग्राहक आहेत. महावितरणच्या आशीर्वादाने कसलीच करवाई अथवा उपाययोजना होत नसल्याने सर्रास आकडे टाकून, मिटरमध्ये छेडछाड केली जात आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात वीज चोरी ही होत आहे. होणारी वीज चोरी रोखण्यासाठी येथील महावितरणचे अधिकारी हे दुर्लक्ष करीत असतात. परंतु परिणामी वीज चोरी, वीजगळती प्रमाण ५० टक्क्यापर्यंत पोहचले आहे आणि वीज बिल हे अनेकजण भरत नसल्याने तालुक्यात आज जवळपास ९ कोटी ५० लाख रु पये थकबाकी वीज ग्राहकांकडे आहे. वारंवार सांगून ही कसलीच कार्यवाही होत नाही. त्यामुळे वसुली ही कमी झाली आहे आणि आकडे टाकून वीज घेतल्यामुळे हमखास रोहित्रात बिघाड होत आहे. परिणामी वीज चोरी करणाºयामुळे मीटर असलेल्या ग्राहकांना नाहक त्रास होत असून, एकदा रोहित्र बिघडल की पंधरा-पंधरा दिवस गावे अंधारात राहतात. यामुळे महावितरण विभाग माजलगावच्या वतीने शुक्र वारी ही मोठी कारवाई केली असून, राष्ट्रीय महामार्गावरील गंगामसला, मोठेवाडी, खरात आडगाव या ठिकाणी आकडे टाकून वीज चोरी करणाºया जवळपास २५० जणांवर कारवाई करण्यात आली आहे. पथकांमध्ये उपविभागीय अभियंता सुहास मिसाळ यांच्यासह, कनिष्ठ अभियंता चेतन चौधरी, मयूर अमरे, प्रताप इंगळे सहायक अभियंता व सर्व ४० लाइनमन कर्मचारी सहभागी होते.
या वीज चोरी करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करणार असल्याचे उपकार्यकरी अधिकारी सुहास मिसळ यांनी सांगितले. तसेच ही कारवाई चालू राहणार असून, शहरासह तालुक्यातील प्रत्यक गावात ही मोहीम राबवली जाणार आहे.