पोलीस बंदोबस्तात पालिकेचा ४५ अतिक्रमणांवर हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 12:36 AM2019-03-13T00:36:24+5:302019-03-13T00:37:01+5:30

बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जुना नगर नाका या दरम्यान असलेल्या ४५ अतिक्रमणांवर पोलीस बंदोबस्तात हातोडा फिरविण्यात आला.

Action against the 45 encroachments by municipalisty | पोलीस बंदोबस्तात पालिकेचा ४५ अतिक्रमणांवर हातोडा

पोलीस बंदोबस्तात पालिकेचा ४५ अतिक्रमणांवर हातोडा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जुना नगर नाका या दरम्यान असलेल्या ४५ अतिक्रमणांवर पोलीस बंदोबस्तात हातोडा फिरविण्यात आला. ही कारवाई बीड नगर पालिकेने मंगळवारी सकाळी केली.
बीड शहरात सर्वत्र अतिक्रमणांचा विळखा पडलेल्या दिसतो. रस्ते अरूंद बनले आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांसह वाहनधारकांना त्रास होतो. वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. पालिकेकडून अतिक्रमण हटावची अनेकवेळा मोहीम हाती घेण्यात आली. काही दिवस रस्ते मोकळे श्वास घेतात. मात्र पालिकेचा दबदबा नसल्याने अवघ्या आठवड्यात पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो.
दरम्यान, हाच धागा पकडून मंगळवारी सकाळीच बीड पालिकेने नगर रोडवरील अतिक्रमण हटविण्यास सुरूवात केली.
अनेकांनी अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र पालिकेने तात्काळ पोलिसांना पाचारण केले. त्यानंतर दुपारपर्यंत ही कारवाई बंदोबस्तात करण्यात आली.
दिवसभरात ४५ अतिक्रमणे काढण्यात आली. यासाठी १ जेसीबी, ३ ट्रॅक्टर, २५ कामगार कार्यरत होते. स्वच्छता विभाग प्रमुख व्ही.टी.तिडके, आर.एस.जोगदंड, भागवत जाधव, भारत चांदणे, ज्योती ढाका, महादेव गायकवाड आदींचा कारवाईत समावेश होता.

Web Title: Action against the 45 encroachments by municipalisty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.