माजलगावात बोगस डॉक्टरविरुद्ध कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 01:15 AM2017-12-22T01:15:18+5:302017-12-22T01:16:05+5:30
बॉम्बे नर्सिंग होमचे प्रमाणपत्र नसताना कालबाह्य औषधी जवळ बाळगून रुग्णांवर उपचार करणाºया मोहन मधुकर बांडगे या बोगस डॉक्टरविरूद्ध माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : बॉम्बे नर्सिंग होमचे प्रमाणपत्र नसताना कालबाह्य औषधी जवळ बाळगून रुग्णांवर उपचार करणाºया मोहन मधुकर बांडगे या बोगस डॉक्टरविरूद्ध माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
माजलगाव तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे. त्याविरुद्ध आरोग्य विभागाने मोहीम उघडली आहे. येथील ग्रामीण अधीक्षक डॉ.सुरेश साबळे यांना गुरुवारी शहरातील संभाजी चौकातील एका इमारतीत बोगस डॉक्टरचा धंदा सुरु असल्याची माहिती मिळताच त्यांनी पथकासह तेथे धाड टाकली. तपासणी केली असता तेथे बांडगे हा इसम बॉम्बे नर्सिंग होमची नोंदणी नसताना व नगर परिषदचे नोंदणी प्रमाणपत्र नसताना रुग्णाची तपासणी करत होता.
त्याच्याजवळ एक्सपायरी औषध आढळून आले. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रल्हाद कुलकर्णी यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून बांडगे विरूद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.