आयपी ॲड्रेसवरून चाईल्ड पॉर्न व्हिडीओ शेअर करणाऱ्यांवर कारवाई; बीडमध्ये चार गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 05:42 PM2022-06-27T17:42:45+5:302022-06-27T17:43:52+5:30

अल्पवयीन मुलाचा ३५ सेकंदांचा हा व्हिडीओ १६ जून २०२० रोजी इन्स्टाग्रामवर शेअर केला गेला. 

Action against those who share child porn videos from IP addresses; Four cases filed in Beed | आयपी ॲड्रेसवरून चाईल्ड पॉर्न व्हिडीओ शेअर करणाऱ्यांवर कारवाई; बीडमध्ये चार गुन्हे दाखल

आयपी ॲड्रेसवरून चाईल्ड पॉर्न व्हिडीओ शेअर करणाऱ्यांवर कारवाई; बीडमध्ये चार गुन्हे दाखल

googlenewsNext

बीड : अल्पवयीन मुलांचा आक्षेपार्ह व्हिडीओ समाजमाध्यमावर शेअर केल्याचा धक्कादायक प्रकार २० जून रोजी समोर आला होता. यावरून अंबाजोगाई शहर, बीड शहर व शिवाजीनगर ठाण्यात गुन्हे नोंद झाले होते. दरम्यान, २५ रोजी शिवाजीनगर ठाण्यात आणखी एक गुन्हा नोंद झाला आहे.

सायबर सेलच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांना पत्रव्यवहार करून आक्षेपार्ह व्हिडीओ चित्रफित व आयपी ॲड्रेस देऊन कारवाईचे निर्देश दिले. त्यानुसार, २० जून रोजी २४ तासांत तीन गुन्हे नोंद झाले होते. तसाच आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. ३५ सेकंदांच्या अल्पवयीन मुलाचा हा व्हिडीओ १६ जून २०२० रोजी इन्स्टाग्रामवर शेअर केला गेला. 

शिवाजीनगर ठाणे हद्दीतून तो शेअर झाल्याने पो.ना. रवींद्र आघाव यांच्या फिर्यादीवरून अंकुशनगर भागातील एका व्यक्तीवर गुन्हा नाेंद झाला आहे. पो.नि. केतन राठोड तपास करत आहेत. दरम्यान, सहा दिवसांत चार गुन्हे नोंद झाल्याने खळबळ उडाली आहे.

 

Web Title: Action against those who share child porn videos from IP addresses; Four cases filed in Beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.