डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधी दिल्यास कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:35 AM2021-04-20T04:35:29+5:302021-04-20T04:35:29+5:30
: सर्दी, तापेची लागण झालेले अनेक रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात न जाता थेट दुकानातून औषधी घेत आहेत. अशा रुग्णांना दुकानदारांनी ...
: सर्दी, तापेची लागण झालेले अनेक रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात न जाता थेट दुकानातून औषधी घेत आहेत. अशा रुग्णांना दुकानदारांनी डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधी, गोळ्या दिल्यास विविध कलमांसह दिवाणी व फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार दुलाजी मेंढके यांनी दिली.
तालुक्यात कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने तालुक्यातील कोरोना रुग्णाची साखळी तोडण्यासाठी तहसीलदार दुलाजी मेंढके, ना. तहसीलदार सचिन देशपांडे, सुहास हजारे, तालुका वैद्यकीय अधिकारी विकास आठवले हे प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी काम करत कार्यवाही करत आहेत. मात्र, तालुक्यात सर्दी, ताप, खोकला असलेले रुग्ण उपचारासाठी दवाखान्यात न जाता दुकानावरून औषधी घेत असल्याने असे रुग्ण कोविड तपासणीविना राहात आहेत. असा प्रकार कोविड १९ चा प्रादुर्भाव वाढविण्यास कारणीभूत ठरत असल्याने ताप, खोकला, सर्दी असलेल्या रुग्णांना डॉक्टारांच्या चिठ्ठीशिवाय कोणतेही औषध देऊ नये, तसे आढळल्यास दुकानदारावर आदेशाची अवज्ञा केल्याप्रकरणी कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आले.