उपस्थिती नसेल तर ‘अॅक्शन’; बीडच्या नूतन सीईओंचा दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 12:08 AM2018-02-08T00:08:20+5:302018-02-08T00:09:16+5:30
बीड : जिल्हा परिषदेत बुधवारी रुजू झालेले नुतन मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी पहिल्याच दिवशी बीड आणि शिरुर तालुक्यात सरप्राइज व्हिजीट करत गैरहजर राहणाºया एक नव्हे दोन नव्हे तर २१ कर्मचाºयांवर कारवाईचा बडगा उगारला. प्रशासन गतिमान करणे हेच आपले व्हिजन राहील, असे त्यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्हा परिषदेत बुधवारी रुजू झालेले नुतन मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी पहिल्याच दिवशी बीड आणि शिरुर तालुक्यात सरप्राइज व्हिजीट करत गैरहजर राहणाºया एक नव्हे दोन नव्हे तर २१ कर्मचाºयांवर कारवाईचा बडगा उगारला. प्रशासन गतिमान करणे हेच आपले व्हिजन राहील, असे त्यांनी सांगितले.
मुळचे सातारा जिल्ह्यातील रहिवासी असलेले सीईओ अमोल येडगे २०१४ च्या आयएएस बॅचमधील अधिकारी असून कळमनुरी येथे उपविभागीय अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले. मागील नऊ महिन्यांपासून ते नाशिक येथे सहायक जिल्हाधिकारी, या पदांवर कार्यरत होते. बीड जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून त्यांची पहिलीच पोस्टींग आहे. बीडमध्ये काम करणे आपल्यासाठी आव्हानात्मक असून बुधवारी विभाग प्रमुखांच्या बैठकीत जि. प. च्या कामांची स्थिती व टीमभावनेतून कसे काम करायचे याबाबत सूचना दिल्या आहेत.
जि. प. च्या अंतर्गत असलेल्या शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकासासाठी प्रशासनाकडून चांगले काम करण्याचा प्रयत्न राहील पायाभूत सुविधा, कर्मचारी आहेत. त्यांच्या माध्यमातून प्रशासन गतीमान करण्याचे आपले व्हिजन असल्याचे ते म्हणाले.
सरप्राईज व्हिजीटने उडाली धावपळ
नुतन सीईओ अमोल येडगे यांनी बुधवारी सकाळी नवगण राजुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, खोकरमोहा जि. प. शाळा व अंगणवाडी तसेच शिरुर पं. स. ला अचानक भेटी दिल्या. गैरहजेरीबरोबरच अंतर्गत स्वच्छतेचा अभाव दिसून आला. राजुरी प्रा. आरोग्य केंद्रात ६ तर शिरुर पं. स. मध्ये गटविकास अधिकारी शशीकांत सोनवणे यांच्यासह १५ कर्मचारी गैरहजर आढळले. त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ‘उपस्थिती नसेल तर अॅक्शन’ अशा शब्दात त्यांनी दांडीबहाद्दरांना इशारा दिला.
हार, बुकेऐवजी पुस्तके
नुतन सीईओ अमोल येडगे यांनी हार, बुके न स्वीकारता पुस्तकांचा स्वीकार केला. शाळांना भेट देण्यासाठी, वाचनासाठी पुस्तके कामी येतील, असे ते म्हणाले. ४० आश्रमशाळांना पुस्तके भेट दिली असून ८१ फिरते वाचनालयांना सहकार्य केल्याचे त्यांनी सांगितले.