अवैध वाळूसाठ्यावर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 12:02 AM2019-06-28T00:02:49+5:302019-06-28T00:03:21+5:30
शहरातील खासबाग परिसरात चार भिंतीच्या मध्ये मोठ्या प्रमाणात वाळू साठा करण्यात आल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार बीड शहर पोलीस ठाण्याने कारवाई करत ५० ते ६० ब्रास अवैध वाळू साठा जप्त केला आहे.
बीड : शहरातील खासबाग परिसरात चार भिंतीच्या मध्ये मोठ्या प्रमाणात वाळू साठा करण्यात आल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार बीड शहर पोलीस ठाण्याने कारवाई करत ५० ते ६० ब्रास अवैध वाळू साठा जप्त केला आहे.
ही कारवाई बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील पोउपनि पवार, शेख, पो.ना रामराव नाईक, शिवाजी सानप, संतोष गिराम, असलम पठाण, नितीन जाधव मावळे, संजय राठोड तलाठी सचिन सानप, व पी.आंधळे यांनी केली.
बीड शहरातील खासबाग परिसरातील मुखिद लाला शेख यांच्या रिकाम्या जागेत हा वाळू साठा करण्यात आला होता. याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन या वाळूची कागदपत्रे व पुरावे मागितले. मात्र, ते न मिळाल्यामुळे हा अवैध वाळू साठा असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले, त्यानुसार तहसीलदारांना माहिती देण्यात आली, त्यानंतर तलाठी व पोलिसांनी मिळून पंचनामा केला व वाळू जप्त केली आहे. पोलीस व तहसील प्रशासन इतर ठिकाणी असलेल्या अवैध वाळू साठ्याचा शोध घेत आहेत.