बीड मधील रॉकेल माफियावर एमपीडीए अंतर्गत कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 09:01 PM2018-01-05T21:01:58+5:302018-01-05T21:02:20+5:30
काळ्या बाजारात रॉकेल विक्री करणार्या शेख जावेद उर्फ बुब्बु शेख बशीर (रा.मोहमंदीया कॉलनी, पेठबीड) या रॉकेल माफियाविरोधात पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी एमपीडीएअंतर्गत कारवाई करून त्याची औरंगाबादच्या हर्सूल कारागृहात रवानगी केली आहे. या कारवाईने रॉकेल माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.
बीड : काळ्या बाजारात रॉकेल विक्री करणार्या शेख जावेद उर्फ बुब्बु शेख बशीर (रा.मोहमंदीया कॉलनी, पेठबीड) या रॉकेल माफियाविरोधात पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी एमपीडीएअंतर्गत कारवाई करून त्याची औरंगाबादच्या हर्सूल कारागृहात रवानगी केली आहे. या कारवाईने रॉकेल माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.
जावेद हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. मागील काही दिवसांपासून त्याच्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे पेठबीडसहर इतर भागात त्याची दहशत होती. रॉकेलची काळ्या बाजारात विक्री करण्याचा त्याचा व्यवसाय होता. त्याच्याविरोधा गेवराई, पेठबीड व बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. न्यायालयातून जामिन मिळताच तो पुन्हा रॉकेलच्या काळाबाजार करायचा. त्याच्यात सुधारणा होत नसल्याचे दिसताच त्याच्यावर एमपीडीएअंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पेठबीड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी.एस.बडे यांनी पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला.
यावर जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी सुनावणी करीत त्याला स्थानबद्ध करून कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे शुक्रवारी त्याच्यावर कारवाई करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे, पोनि बी.एस.बडे यांनी केली.