अंबाजोगाई परिसरात गावठी दारू अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 07:27 PM2019-04-01T19:27:19+5:302019-04-01T19:30:18+5:30

पथकाने मुद्देमाल जप्त करून तो जागेवरच नष्ट केला

Action of the state excise department at the illegal liquor adda at Ambajogai area | अंबाजोगाई परिसरात गावठी दारू अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

अंबाजोगाई परिसरात गावठी दारू अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

Next

अंबाजोगाई (बीड) : चनई तांडा शिवारात अवैधरित्या सुरू असलेल्या हातभट्टी केंद्रांवर सोमवार,दि.1 एप्रिल रोजी राज्य उत्पादन शुल्क, अंबाजोगाई विभाग निरीक्षकांच्या पथकाने धाड टाकून तब्बल 83 हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तो जागेवरच नष्ट केला असल्याची माहीती प्रभारी निरीक्षक अनिल गायकवाड यांनी दिली.

देशात सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे.या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसात विविध ठिकाणी अवैध हातभट्टी केंद्रांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने धाडी टाकण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडे यांच्या सुचनेनुसार व राज्य उत्पादन शुल्क बीडचे अधिक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई येथील चनई तांडा शिवारात व परिसरात हातभट्टी दारू केंद्रांवर गोपनीय माहितीच्या आधारे धाड टाकण्यात आली.

यात दारू तयार करण्याचे प्लास्टीक टाकीत भरलेले एक 500 लिटर रसायन,200 लिटरचे 16 लोखंडी बॅरल,50 लिटरचे दोन प्लॅस्टीक कॅन यासह एकुण मिळून सुमारे 83 हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तो  जागेवरच तात्काळ नष्ट करण्यात आला. या कारवाईत प्रभारी निरीक्षक अनिल गायकवाड, कॉन्स्टेबल बि.के.पाटील व वाहनचालक के.एन.डुकरे यांचा सहभाग होता. 

Web Title: Action of the state excise department at the illegal liquor adda at Ambajogai area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.