विनामास्क फिरणाऱ्या ५५ लोकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 05:04 AM2021-02-21T05:04:17+5:302021-02-21T05:04:17+5:30
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून मास्क वापरा, सोशल डिस्टन्स ठेवा असे आवाहन केले जात आहे. परंतू जनता याला प्रतिसाद ...
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून मास्क वापरा, सोशल डिस्टन्स ठेवा असे आवाहन केले जात आहे. परंतू जनता याला प्रतिसाद न देता बिनधास्त फिरत आहे. त्यामुळे संसर्ग वाढण्यासह कोरोनाची रूग्णसंख्या वाढत आहे. याला आळा बसाावा, यासाठी प्रशासनाने आता कडक पाऊले उचलणे सुरू केले आहे. शनिवारी सकाळीच बीड नगर पालिकेने पोलिसांच्या मदतीने विना मास्क फिरणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई केली. ज्यांच्या तोंडाला मास्क नाही, अशांना ५०० रूपये दंड वसूल करण्यात आला. दिवसभरात ५५ लोकांवर कारवाई करून १८ हजार ३०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. पालिकेचे मुख्याधिकारी डाॅ.उत्कर्ष गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व स्वच्छता निरीक्षक व त्यांच्या पथकाने या कारवाया केल्या.
कोट,
विनामास्क फिरणाऱ्या ५५ लोकांवर दंडात्मक कारवाई करून १८ हजार ३०० रूपये दंड वसूल करण्यात आला. या कारवायात पोलिसांचीही मदत झाली. आता यापुढेही अशा कारवाया सुरूच राहतील. यासाठी पथकांची नियूक्ती केलेली आहे.
डॉ.उत्कर्ष गुट्टे, मुख्याधिकारी नगर परिषद बीड
===Photopath===
200221\202_bed_22_20022021_14.jpeg
===Caption===
बीड शहरात शनिवारी विनामास्क फिरणाऱ्यांकडून दंड वसूल करताना बीड नगर पालिकेचे पथक दिसत आहे.