मनरेगा गैरव्यवहार प्रकरणात १८ गावांच्या ग्रामसेवक, सरपंचावर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2020 03:37 PM2020-09-03T15:37:36+5:302020-09-03T15:41:14+5:30
१८ गावांच्या सरपंचांना प्रत्येकी एक हजार रुपए दंडाची शास्ती
बीड : जिल्ह्यातील आष्टी येथील पंचायत समिती अंतर्गत मनरेगाच्या कामात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी मोठी कारवाई करत १६ ग्रामसेवकांच्या वार्षिक वेतनवाढी कायमस्वरुपी बंद केल्या. १८ ग्रामरोजगार सेवकांची सेवा समाप्त करण्यात आली असून नवे ग्रामरोजगार सेवक नियुक्तीबाबत ग्रामपंचायतींना आदेशित करण्यात आले. तसेच १८ सरपंचांना प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शास्ती करण्यात आली आहे.
आष्टी पं. सं. अंतर्गत मनरेगा कामातील गैरव्यवहारप्रकरणी तक्रार आल्यानंतर १४ मे रोजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पं.) दत्तात्रय गिरी आणि लेखा अधिकारी आव्हाड यांची समिती नेमण्यात आली होती.
या समितीने मनरेगा अंतर्गत झालेल्या कामाची प्रत्यक्ष गावात व कामाच्या ठिकाणी ८ स्वतंत्र पथके नेमून चौकशी केली. ३९ ग्रामपंचायतमधील कामांच्या तक्रारी होत्या. गावात काही मयत, पेन्शनर, वयोवृद्ध, नोकरदार, दिव्यांग, स्थलांतरीत अशा काही मजुरांच्या नावे मजुरीची रक्कम अदा केल्याचे निदर्शनास आले. तसेच या गावात चुकीचे जॉबकार्ड नोंदणी केल्याचे व काही चुकीचे मजूर दर्शवून काम मागणी नोंदवल्याचे तसेच बोगस नावांवर रक्कम अदा केल्याचे निदर्शनास आले. त्यावरून सीईओंनी ही जम्बो कारवाई केली.
बीडीओची विभागीय चौकशी
तत्कालीन गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांना विभागीय चौकशी करण्याबाबतची नोटीस दिली आहे. पंचायत समिती स्तरावरील डेटा इन्ट्री आॅपरेटर पाखरे याचीदेखील सेवा समाप्त करण्यात आली.एकूण ३९ ग्रामपंचायतमधील कामांची तक्रार होती.
या सरपंचांना प्रत्येकी हजार रूपयांचा दंड
बाबासाहेब शेकडे (म्हसोबावाडी), संगिता सरपते (शेडाळा), कृष्णा शेकडे (गौखेल), कांताबाई पानसाडे (ब्रम्हगाव), कांतीलाल गटकळ (वाघळूज), छाया माळी ( पिंपळगाव घाट), रोजंद्र म्हस्के (सावरगाव), पारुबाई झरेकर ( मोराळा), शिवाजी मगर (बांधखेल), रंजना सुर्यवंशी (नागतळा), सखुबाई गायकवाड (बेलतुरी), आदिनाथ विधाते (नांदूर), सुमन कवडे (पिंपळगाव दाणी), गयाबाई मुरुमकर (कोयाळ), मनिषा चव्हाण( डोंगरगण), शेभा गर्जे (पाटसरा), आसराबाई केन्द्रे (वंजारवाडी),बबन तळेकर (देवळाली)
या ग्रामसेवकांच्या वार्षिक वेतनवाढ कायम बंद
गौखेल येथील सय्यद शकील जमादार, उषा म्हेत्रे (वाघळूज), दादासाहेब वाणी (पिंपळगाव घाट, सावरगाव घाट), उद्धव शिंदे (नांदूर), प्रवीण बवार (शेडाळा), नितीन गायकवाड (नागतळा), संजय नेयके (ब्रह्मगाव), बलभीम परकाळे (बांधखेल), सोनाली साखरे (म्हसोबाची वाडी, बेलतुरी), अनिल सानप (मोराळा) या ग्रामसेवकांच्या दोन वार्षिक वेतनवाढी कायमस्वरुपी बंद करण्यात आल्या. तर गोवर्धन गिरी (वंजारवाडी), दत्तात्रय घोडके (डोंगरगण), विष्णू बांगर (पाटसरा), धुळाजी आजबे( देवळाली), अशोक आडसूळ (कोयाळ), आनंद शिंदे (पिंपळगाव दाणी) यांच्या एक वार्षिक वेतनवाढ कायम बंद करण्यात आली.
१८ ग्रामरोजगार सेवकांची सेवा समाप्त
नानासाहेब खराडे (पिंपळगाव दाणी), साधू मुरुमकर (कोयाळ), विठ्ठल मिसाळ (डोंगरगण), अंकुश गर्जे (पाटसरा), उद्धव बेद्रे (वंजारवाडी), विठ्ठल तांदळे (देवळाली), सुरेश शेकडे (म्हसोबावाडी), शेख जावेद (शेडाळा), सोपान आहेरकर (गौखेल), बाबासाहेब देशमुख (ब्रम्हगाव), ज्ञानदेव मोहिते (वाघळूज), वैभव दुधलमल (पिंपळगाव घाट), दत्तात्रय मस्के (सावरगाव), संजय वनवे( मोराळा/ नागतळा), शिवाजी थोरात (बांधखेल), पांडुरंग धन्वे (वेलतुरी), सूर्यभान विधाते (नांदूर)