गोदापात्रात तहसीलच्या पथकाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 12:30 AM2019-07-15T00:30:45+5:302019-07-15T00:31:14+5:30
गेवराई तालुक्यातील बोरगाव व गुंतेगाव येथून अवैधरीत्या वाळू उपसा करून ट्रॅक्टरमध्ये घेऊन जात असताना तहसीलदार, तलाठी व मंडळ अधिकारी यांनी रविवार रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास पकडून दोन ट्रॅक्टर व दोन मोटार सायकलसह १६ लाखाचा मुदेमाल ताब्यात घेतला
गेवराई तालुक्यातील बोरगाव व गुंतेगाव येथून अवैधरीत्या वाळू उपसा करून ट्रॅक्टरमध्ये घेऊन जात असताना तहसीलदार, तलाठी व मंडळ अधिकारी यांनी रविवार रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास पकडून दोन ट्रॅक्टर व दोन मोटार सायकलसह १६ लाखाचा मुदेमाल ताब्यात घेतला व तसेच दोघाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला तसेच चार ट्रॅक्टर व दहा मजूर पळून गेल्या प्रकरणी त्यांच्या विरूद्ध देखील चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
तालुक्यातील गोदावरी नदी काठावरील गुंतेगाव व बोरगाव येथे अवैध वाळूचा उपसा होत असल्याची माहिती मिळाल्यावरून गस्त घालत असताना तहसीलदार संगीता चव्हाण, मंडळ अधिकारी सुनिल तांबारे, गजानन देशमुख,अंकुश सुतार,विठ्ठल सुतार यांनी रविवारी सायंकाळी ७ च्या सुमारास अचानक नदीपात्रात जाऊन पाहणी केली असता या ठिकाणी दोन ट्रॅक्टर अवैध वाळू घेऊन येत असल्याचे दिसताच ते ट्रॅक्टर ताब्यात घेऊन यात दोन ब्रास वाळू व दोन ट्रॅक्टर व दोन मोटारसायकल असा जवळपास १६ लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन त्यांच्याविरूद्ध चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चार ट्रॅक्टर व दहा मजूर गोदावरी नदी पात्रातून पळून गेले या चार ट्रॅक्टर चालक व मालकाविरूद्ध चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.