गेवराईत दगडफेक प्रकरणी आंदोलकांची धरपकड सुरु; ११ जणांना घेतले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 01:57 PM2018-07-26T13:57:18+5:302018-07-26T13:59:10+5:30
दगडफेक प्रकरणी पोलिसांनी गेवराई ठाण्यात १०० आंदोलकांवर गुन्हे दाखल केले.
गेवराई (बीड) : शहरात मराठा आंदोलनाला बुधवारी हिंसक वळण लागून दगडफेक झाली होती. यात आंदोलकांनी ९ बस फोडल्या. याप्रकरणी पोलिसांनी गेवराई ठाण्यात १०० आंदोलकांवर गुन्हे दाखल केले. यानंतर बुधवारी रात्रीपासूनच पोलिसांनी त्यांची धरपकड सुरु करून ११ जणांना ताब्यात घेतले.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शहरात बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अर्ध नग्न आंदोलन करण्यात आले. यानंतर आमदार लक्ष्मण पवार याच्यां घरांसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी अचानक गोधंळ उडून पळापळ झाली. यातच आंदोलकांनी पोलिस व भाजपा कार्यालयावर दगडफेक केली.
यानंतर पोलिसांनी शासकिय कामात अडथळा, शासकीय मालमत्तेचे नुकसान, जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी १०० जणांवर गुन्हे दाखल केले. यातील ११ जणांना पोलीसांनी बुधवारी रात्री शहरातील विविध भागांतून अटक केली. यातील दिपक आतकरे, सचिन मोटे,स्वप्नील मस्के, कृष्णा गळगुंडे, महेश बेदरे, अर्जुन चाळक, शिवनाथ परळकर, सुनिल ठोसर, गोवर्धन घाडगे, गणेश मुळे, वसंत सुस्कर यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.