कार्यकर्ता सत्तेत जनसेवक, विरोधात योद्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 11:55 PM2020-02-21T23:55:01+5:302020-02-21T23:55:36+5:30
भाजपाचा कार्यकर्ता हा सत्तेत जनसेवक असतो तर विरोधात योद्धा असतो. अन्यायाविरोधात चीड हा त्यांच्या रक्तातील गुण आहे. आज सत्तेत नसलो तरी हताश होण्याची गरज नाही. मागणी करूनही मिळाले नाही तर आंदोलने करून मागण्या पूर्ण करण्याची धमक आपल्यामध्ये असल्याचे सांगत माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना बळ दिले.
बीड : भाजपाचा कार्यकर्ता हा सत्तेत जनसेवक असतो तर विरोधात योद्धा असतो. अन्यायाविरोधात चीड हा त्यांच्या रक्तातील गुण आहे. आज सत्तेत नसलो तरी हताश होण्याची गरज नाही. मागणी करूनही मिळाले नाही तर आंदोलने करून मागण्या पूर्ण करण्याची धमक आपल्यामध्ये असल्याचे सांगत माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना बळ दिले.
शुक्रवारी बीडमध्ये एका कार्यक्रमात त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी खा. डॉ. प्रीतम मुंडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, राजेंद्र मस्के यांच्याकडे याआधी मोठे पद होते. आज ते राष्ट्रीय पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत. हे पद मोठी जबाबदारी आहे. या माध्यमातून बीड जिल्ह्यातील जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करावी. प्रत्येकाला मानसन्मानाने सोबत घेऊन काम करा. भविष्यात अनेक निवडणुकांना सामोरे जायचे असल्याचे त्या म्हणाल्या. सत्तेत असताना आपण अनेक लोकहिताची कामे केली आहेत. जनहितासाठी साहेबांचा संघर्षाचा वसा आपल्याकडे आहे. बीड जिल्ह्यातील जनता क्रांतिकारी विचारांची आहे. नेता बदलला तरी जनता बदलत नाही. त्यामुळे भविष्यात भाजपला चांगले दिवस येणार असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या.
यावेळी अक्षय मुंदडा, मोहन जगताप, माजी आ.आदिनाथराव नवले, केशवराव आंधळे, रमेश पोकळे, नवनाथ शिराळे, माजी जि.प. अध्यक्षा सविता गोल्हार, माजी उपाध्यक्षा जयश्री मस्के, जि. प. सदस्य भारतराव काळे, विजयकांत मुंडे, अशोक लोढा, राणा डोईफोडे, रामराव खेडकर, रामदास बडे, अविनाश मोरे, जगदीश गुरखुदे, धारूरचे नगराध्यक्ष स्वरूपसिंह हजारी, तालुकाध्यक्ष स्वप्नील गलधर, राजेंद्र बांगर, सर्जेराव तांदळे, भगीरथ बियाणी, विक्रांत हजारी, आदित्य सारडा, बाबरी मुंडे, संगीता धसे, जयश्री मुंडे, चंपाबाई पानसंबळ, संध्या राजपूत, सरपंच वसंत गुंदेकर सह पदाधिकारी उपस्थित होते.