आदर्शग्राम कुसळंब बनलेय २३ गावांचा आधार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:34 AM2021-04-24T04:34:40+5:302021-04-24T04:34:40+5:30
पाटोदा : तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. खाटा मिळण्यास अडचणी येत असल्याने आदर्शग्राम कुसळंब येथे ग्रामस्थ व आरोग्य विभागाच्या ...
पाटोदा : तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. खाटा मिळण्यास अडचणी येत असल्याने आदर्शग्राम कुसळंब येथे ग्रामस्थ व आरोग्य विभागाच्या पुढाकाराने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पहिले कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. आता हे सेंटर परिसरातील २३ गावांसाठी आधार ठरणार आहे.
कुसळंब गाव आदर्श आहे. शासनाचे पुरस्कारही या गावाला मिळालेले आहेत. राजकीय विरोध नाही. गावची एकी असल्याने येथे प्रत्येक काम समन्वयाने केले जाते. असाच संकल्प सीसीसी उभारण्याबाबत करण्यात आला होता. त्याप्रमाणे आरोग्य विभाग, मानवलोक संस्था अंबाजोगाई, ग्रामपंचायत कुसळंब, खंडेश्वर विद्यालय कुसळंब यांच्या संयुक्त सहकार्याने कुसळंबमध्ये ५० खाटांचे कोविड सेंटर सुरू करण्यात आले. गावचे भूमिपुत्र तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी. पवार यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. मानवलोक संस्थेने येथे खाटा, गाद्या आदी भौतिक सुविधा पुरविल्या.
दरम्यान, या सीसीसीला शुक्रवारी प्रत्यक्षात सुरुवात झाली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी. पवार, तहसीलदार मुंदलोड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मीकांत तांदळे, सभापती सुवर्णा लांबरुड, ॲड. अजित देशमुख, वैद्यकीय अधिकारी डॉ. चैताली भोंडवे, डॉ. मोहित कागदे, सहायक पोलीस निरीक्षक महेश आंधळे, सरपंच शिवाजी पवार, शिवनाथ पवार, बाळासाहेब पवार, प्राचार्य एस.के. पवार, आबासाहेब पवार, मंगेश पवार, संजय गायकवाड, ॲड. विलास पवार, शेलार, डॉ. शिवाजी पवार, संतोष भालेराव, बाळासाहेब कासार आदींची उपस्थिती होती.
सीएचओ, कर्मचाऱ्यांची नियुक्ती
बाधितांवर काय उपचार करावे, त्यांना कोणत्या वेळेला काय औषधी द्यावीत, याची माहिती देणारे फलक प्रत्येक खोलीत लावले आहेत. तसेच त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी सीएचओ, कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तसेच पाणी, स्वच्छता आदी सुविधा ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केल्या जाणार आहेत.
===Photopath===
230421\23_2_bed_30_23042021_14.jpeg
===Caption===
कुसळंब सीसीसीला शुक्रवारी सुरूवात झाली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार, तहसीलदार मुंदलोड, डॉ.एल.आर.तांदळे, डाॅ.चैताली भोंडवे, सुवर्णा लांबरूड,सरपंच शिवाजी पवार, ग्रामस्थ आदी.