व्यसनाधीन शिक्षकामुळे शाळा पडली बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 06:57 PM2017-08-17T18:57:31+5:302017-08-17T18:59:06+5:30
तालुक्यातील ब्राम्हणवाडी येथे जिल्हा परिषदेची ४ थी पर्यंतची प्राथमिक शाळा आहे. परंतु, या शाळेवरील व्यसनाधीन शिक्षकामुळे आज या शाळेत एकही विद्यार्थी नाही. या व्यसनाधीन शिक्षकावर कारवाई करून बदली करावी अशी मागणी ग्रामस्थांनी वारंवार करूनही शिक्षण विभागाने याकडे दुर्लक्ष्य केले.
ऑनलाईन लोकमत
पाटोदा (बीड ), दि. १७ : तालुक्यातील ब्राम्हणवाडी येथे जिल्हा परिषदेची ४ थी पर्यंतची प्राथमिक शाळा आहे. परंतु, या शाळेवरील व्यसनाधीन शिक्षकामुळे आज या शाळेत एकही विद्यार्थी नाही. या व्यसनाधीन शिक्षकावर कारवाई करून बदली करावी अशी मागणी ग्रामस्थांनी वारंवार करूनही शिक्षण विभागाने याकडे दुर्लक्ष्य केले. परिणामी गावक-यांनी त्यांच्या पाल्यांना बाहेरगावच्या शाळेत पाठवावे लागत आहे.
ब्राम्हणवाडी येथील प्राथमिक शाळेत चौथीपर्यंतचे शिक्षण दिले जाते. या शाळेत पी.यु. बनसोडे यांची नियुक्ति करण्यात आलेली आहे. बनसोडे हे शाळेत व्यसन करून येतात, ग्रामस्थांशी व पालकांशी अरेरावी करतात अशा गावक-याच्या त्यांच्या बद्दल तक्रारी आहेत. याबाबत गाक-यांनी शिक्षण विभागाकडे रीत सर दाद देखील मागितली. परंतु, त्यांच्याकडून काहीच कारवाई झाली नाही. यामुळे वैतागून पालकांनी त्यांच्या पाल्यांचा प्रवेश मंझरी, दिघोळ, चौसाळा या बाहेर गावच्या शाळेत घेतला आहे. यामुळे आज या शाळेत एकही विद्यार्थी नाही. शाळा बंद पडण्यास कारणीभूत असलेल्या या बेजबाबदार शिक्षकावर कारवाईची मागणी हरिदास राजगुरु, ठकसेन खाडे, त्रिंबक पौळ, राम घोगरे आदी ग्रामस्थानी केली आहे.