जिल्हा क्रीडा संकुलात मिळणार वाढीव सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2019 12:07 AM2019-12-09T00:07:05+5:302019-12-09T00:08:12+5:30
जिल्हा क्रीडा संकुलात अंतर्गत सुविधांसाठी करण्यात येणाऱ्या विविध कामांना जिल्ह क्रीडा संकुल समितीने मंजुरी दिली आहे. याचा खेळाडू व क्रीडाप्रेमींना लाभ मिळणार आहे. या कामांसाठी ४ कोटी १८ लाख रूपयांचा निधी प्रस्तावित आहे.
बीड : जिल्हा क्रीडा संकुलात अंतर्गत सुविधांसाठी करण्यात येणाऱ्या विविध कामांना जिल्ह क्रीडा संकुल समितीने मंजुरी दिली आहे. याचा खेळाडू व क्रीडाप्रेमींना लाभ मिळणार आहे. या कामांसाठी ४ कोटी १८ लाख रूपयांचा निधी प्रस्तावित आहे.
जिल्हा क्रीडा संकुलात सध्या विकासाच्या दृष्टीने अनेक कामे हाती घेतले जात आहेत. नुकतीच स्वच्छता व रंगरंगोटी आणि भिंतीवरील चित्रांमुळे संकुल आकर्षक झाले आहे. आता याच संकुलात धावणे मार्ग, वसतिगृह, जॉगिंग, पार्किंग आदी विकास कामांबाबत दोन महिन्यांपूर्वी आराखडा तयार करून जिल्हा क्रीडा कार्यालयाने संकुल समितीसमोर मांडला होता. ४ कोटी १८ लाख ४ हजार १९७ रूपयांचा अंदाजित निधी या कामांसाठी होता. याच कामांना आणि निधीला समितीने मंजुरी दिली आहे.
दरम्यान, नूतन जिल्हाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारताच त्यांना हा सर्व प्रस्ताव दाखविल्यावर बांधकाम विभाग यावर कार्यवाही करणार आहे. तांत्रिक मान्यता मिळताच टेंडर काढून कामांना सुरूवात केली जाणार आहे. ही सर्व कामे झाल्यावर खेळाडू व क्रीडा प्रेमींना मोठा फायदा होणार आहे. ही कामे दर्जेदार व लवकर पूर्ण करावीत, अशी अपेक्षा बीडकरांना आहे.
असे आहेत कामे आणि निधी (रूपयांमध्ये)
४०० मिटर धावण मार्ग, हॉकी, फुटबॉल मैदान अद्यावत करणे - ८०८७०७३
४०० मीटर धावणे मार्गाच्या आतील व बाहेरील बाजूने नाली बांधकाम करणे - ६०१०७७७
खेळाडू वसतिगृहातील ३ रा मजला बांधकाम करणे - ९८६६३४७
संकुलामध्ये विविध मैदानांवर पाण्याची सुविधा पुरविणे - ६४००००
चालण्यासाठी ट्रॅक बनविणे - ७३०००००
संकुलात पार्किग एरिया विकसित करणे -६४०००००
पार्किंग एरियाला कंपाऊंड वॉल व ग्रील वर्क करणे - ३५०००००