मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज, दुपारपर्यंत जिकडे तिकडे निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 11:53 PM2019-10-23T23:53:14+5:302019-10-23T23:54:21+5:30
जिल्हयातील विधानसभा निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने २४ आॅक्टोबर रोजी मतमोजणी होत आहे. सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. सहा विधानसभा मतदारसंघ निहाय मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले असून दुपारपर्यंत सर्व निकाल हाती लागतील, अशी शक्यता आहे.
बीड : जिल्हयातील विधानसभा निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने २४ आॅक्टोबर रोजी मतमोजणी होत आहे. सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. सहा विधानसभा मतदारसंघ निहाय मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले असून दुपारपर्यंत सर्व निकाल हाती लागतील, अशी शक्यता आहे.
१४ टेबलवर मतमोजणी
प्रत्येक विधानसभा मतदारसंघात १४ टेबलवर मतमोजणी होणार आहे. विधानसभा मतदारसंघ, एकूण मतदार केंद्र व मतमोजणीच्या फेऱ्या अनुक्र मे पुढीलप्रमाणे.
आष्टीत होणार सर्वाधिक फेºया
गेवराई ३९५ मतदान केंद्र- २९ फेºया, माजलगाव ३७४ मतदान केंद्र- २७ फेºया, बीड ३७४ केंद्र २७ फेºया, आष्टी ४३८ केंद्र ३२ फेºया, केज ४०५ केंद्र २९, फे-या परळी ३३५ मतदान केंद्र २४ फेºया होणार आहेत.
मतमोजणीनंतर अशी होणार खात्री
संपूर्ण मतमोजणीनंतर निवडणूक आयोगाचे निरीक्षक, उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत चिठ्या टाकून निवडलेल्या पाच मतदान केंद्रावरील आधी कंट्रोल युनिटमधील मते आणि व्हीव्हीपॅट पेपर स्लीपची खातरजमा करण्यात येणार आहे. यासाठी बॅँकेतील कॅशिअर ट्रेलर सारखे स्वतंत्र व्होटर स्लीप काऊंटिंग बूथ (व्हीसीबी) असणार आहे. सीसीटीव्हीची येथे व्यवस्था केली आहे. निवडणुकीचा अंतिम टप्पा पारदर्शी आणि सुरक्षित, सुरळीत होण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.
आयोगाकडून मतमोजणी निरीक्षक नियुक्त
विधानसभा मतदारसंघ निहाय मतमोजणीसाठी भारत निवडणूक आयोगाने मतमोजणी निरीक्षक नियुक्त केले आहेत. गेवराई विधानसभा मतदार संघ- शिरदंदू चौधरी, माजलगाव - अनिल कुमार पालीवाल, बीड - प्रांजल यादव, आष्टी - जितेंद्र मोहन सिंग, केज - इ-ायल इंगटी आणि परळी - विधानसभा मतदार संघ, एन. पद्यकुमार
इथे होणार मतमोजणी : सीसीटीव्हीची व्यवस्था
गेवराई - आर.बी. अट्टल महाविद्यालय, माजलगाव- कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगाव, बीड - कृषी उत्पन्न बाजार समिती, आष्टी - औद्योगिक प्रशिक्षण संस्था, केज - तहसील कार्यालय, परळी - क्लब बिल्डींग, थर्मल कॉलनी परळी.