७२ वर्षांनंतर मामला तलावाने तळ गाठला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 12:22 AM2019-02-02T00:22:20+5:302019-02-02T00:22:48+5:30

वडवणी शहरातील, वाडे वस्ती तांड्यांची अंदाजे २० हजार लोकसंख्या आहे. दिवसेंदिवस त्यात वाढ होत असून शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मामला तलावाने ७२ वर्षांनंतर प्रथमच तळ गाठला आहे.

After 72 years, the case got to the bottom of the lake | ७२ वर्षांनंतर मामला तलावाने तळ गाठला

७२ वर्षांनंतर मामला तलावाने तळ गाठला

Next
ठळक मुद्देदुष्काळाची गडद छाया : मात करण्यासाठी प्रशासन सज्ज; २५० फुटापर्यंत खोदकाम करूनही बोअरवेल कोरडेच...!

वडवणी : वडवणी शहरातील, वाडे वस्ती तांड्यांची अंदाजे २० हजार लोकसंख्या आहे. दिवसेंदिवस त्यात वाढ होत असून शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मामला तलावाने ७२ वर्षांनंतर प्रथमच तळ गाठला आहे.
शहरासह व तांडे वस्तीमधील नागरिकांची तहान भागवण्यासाठी मामला तलावातून पाणी पुरवठा केला जात आहे. यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत नगण्य पाऊस झाल्याने तलावात पाणी साठा अपुरा आहे. भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने दीड महिन्यांपासून तलावातून पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे.
तालुक्यातील पाणी प्रश्न गंभीर होण्याची चिन्ह असल्याने आतापासूनच बोअर घेणाºया गाड्या शेतात फिरू लागल्या आहेत. पाणी पातळी खालावल्याने खोदकाम करताना २०० ते २५० फुटापर्यंत केवळ धुराळाच उडत आहे.
तालुक्यात कधी नव्हे ते या वर्षी पाणी प्रश्न गंभीर होणार आहे. दोन वर्षापासून पावसाचे प्रमाण घटल्याने पाणी पातळी कमालीची घटली आहे. शेतकºयांच्या हातातून खरीप व रबी अशी दोन्ही हंगाम गेल्यात जमा आहेत, फळबागा, इतर बागायती पिके अल्पश्या पाण्यावर तग धरून होती; मात्र तेही यावर्षी नष्ट झाली आहेत, भविष्यात हे बागायती क्षेत्र नष्ट होण्याची भीती आहे. शेतकºयांची आशाही वेडी असते, जमिनीत पीक येवो अथा न येवो, तो पेरणी करतोच. त्यानंतर पाण्याच्या आशेने खोलवर विहीर, बोअर घेण्याचे त्याचे कार्य सुरूच असते.
यावर्षी जानेवारी महिन्यातच सर्वच पाणी साठ्यांनी तळ गाठला, तर काही पूर्णपणे आटले आहेत. शेतकºयांनी आहे ते बागायती पीक व जनावरांना जगवण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत, दरवर्षी फेब्रुवारी, मार्चनंतर येणाºया परप्रांतीय गाड्या परिसरात नोंव्हेबरमध्येच अवतरल्या. त्यांचीही मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे. शेतकरी पाणी लागेल या आशेने बोअर घेत आहेत. ९०० फुटापर्यंतही बोअर घेऊन फारसे पाणी लागत नसल्यान, तसचे काही बोअर कोरडे जात असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. एकूणच या वर्षी पाणी प्रश्न अधिकच गंभीर होणार आहे.
या दुष्काळाचा सामना करण्यासाठी प्रशासनही सज्ज झाले असून, त्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असून, नागरिकांनीही त्यासाठी सहकार्य करण्याची आवश्यकता असल्याचे नगराध्यक्षा मंगल मुंडे यांनी सांगितले.

१७ प्रस्ताव दाखल : दोन टँकर कार्यरत
शहरातील पाणी पुरवठा करण्यासाठी १७ टॅकर प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल करण्यात आले असून फक्त ६ टॅकर प्रस्ताव मंजूर झाले आहेत. यापैकी २ टॅकर कार्यान्वित झाली आहेत.
मंजूर टँकरपैकी ४ अजूनही अद्यापही दाखल झाले नाहीत.६ टॅकरच्या प्रत्येकी ३ खेपा प्रमाणे पाणीपुरवठा केला जाणार आहे, अशी माहिती नगरपंचायतीचे पाणीपुरवठा विभाग प्रमुख टी.व्ही. रांजवण यांनी दिली.

Web Title: After 72 years, the case got to the bottom of the lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.