देवीची ज्योत आणल्यानंतर शेतात गेलेल्या तरुणाची अपघाती प्राणज्योत मावळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2021 06:38 PM2021-10-07T18:38:00+5:302021-10-07T18:43:02+5:30

जनावरांना पाणी देताना विहिरीत तोल जाऊन पडल्याने तरुणाचा मृत्यू 

After bringing the flame of the goddess, the young man who went to the field died | देवीची ज्योत आणल्यानंतर शेतात गेलेल्या तरुणाची अपघाती प्राणज्योत मावळली

देवीची ज्योत आणल्यानंतर शेतात गेलेल्या तरुणाची अपघाती प्राणज्योत मावळली

googlenewsNext
ठळक मुद्देदेवीची ज्योत आणली आणि शेतात गेला  विहिरीत तोल जाऊन पडल्याने बुडून मृत्यू 

कडा ( बीड ) : जनावरांसाठी पाणी शेंदत असतांना अचानक तोल गेल्याने विहिरीत पडलेल्या एका १८ वर्षीय तरूणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास खिळद येथे घडली. विकास बारुके गर्जे असे मृत तरूणाचे नाव आहे. 

विकास गर्जेने सकाळी गावात येडेश्वरी देवीची ज्योत आणली. त्यानंतर जनावरांना पाणी पाजण्यासाठी तो शेतात गेला. मात्र, पाणी शेंदत असताना अचानक तोल गेल्याने तो विहिरीत पडला. यावेळी सोबत असलेल्या दोन मुलांनी याची माहिती घरी दिली. नातेवाईकांनी विहिरीकडे धाव घेतली मात्र तोपर्यंत विकासचा बुडून मृत्यू झाला होता. अंभोरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रोहित बेंबरे, पोलिस नाईक कल्याण राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. 

गावावर शोककळा 
विकासने काही मित्रांसोबत बुधवारी मोहटा देवी येथून पायी जात आज सकाळी ज्योत आणली. ज्योत मिरवणूक संपली आणि तो शेतात गेला. देवीचा आंदोत्सव सुरु असताना विकासची प्राणज्योत मावळल्याने गावावर शोककळा पसरली आहे. 
 

Web Title: After bringing the flame of the goddess, the young man who went to the field died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.