कोरोनातून बरे झाल्यानंतर व्यायाम, पोषणावर भर द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:32 AM2021-04-10T04:32:27+5:302021-04-10T04:32:27+5:30
कोरोना विषाणू संसर्गाची बाधा होऊ नये, यासाठी रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासह सुरक्षात्मक खबरदारी घेणे जेवढे महत्त्वाचे आहे. तेवढेच कोरोनावर मात ...
कोरोना विषाणू संसर्गाची बाधा होऊ नये, यासाठी रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासह सुरक्षात्मक खबरदारी घेणे जेवढे महत्त्वाचे आहे. तेवढेच कोरोनावर मात केल्यानंतरही शारीरिक पोषण गरजेचे आहे. व्यायाम, आहार, विहार व डॉक्टरांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन रुग्णांनी केले पाहिजे. कोरोनातून बरे होऊन तीन महिन्यांनंतर एखाद्याच्या शरीरातील अँटीबॉडीज नाहीशा होऊ शकतात. अशा व्यक्ती बाधितांच्या संपर्कात आल्यास पुन्हा कोरोनाची लागण होऊ शकते, अशी अनेक उदाहरणे आपल्याकडे आहेत. यासाठी कोरोनावर मात केल्यानंतर व्यायाम, योगासने व शरीराच्या पोषणासह सुरक्षात्मक खबरदारी महत्त्वाची ठरते.
हेही महत्त्वाचे
सकाळी दात घासल्यानंतर गरम पाणी पिऊन दिवसाची सुरुवात करा. शरीराची झीज भरून काढण्यासाठी पौष्टिक आहारच घ्यावा. इतर दुर्धर आजारग्रस्तांनी वैद्यकीय सल्ल्यानेच औषधोपचार सुरू ठेवावा. शरीरातील ऑक्सिजनची पातळी नियमित तपासावी. कोविड मुक्तीनंतर पुरेसी झोप घ्यावी व तणावमुक्त राहावे. कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवत असल्यास डॉक्टरांशी तत्काळ संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. धाकडे यांनी केले आहे.