आत्महत्याग्रस्त शेतक-याची मृत्युनंतरही विटंबना, उद्ध्वस्त केली अंत्यविधीची जागा 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2018 05:42 PM2018-03-11T17:42:38+5:302018-03-11T19:54:25+5:30

तालुक्यातील पात्रुड येथील विलास काळे या शेतक-याने दोन दिवसांपूर्वी कर्जास कंटाळून आत्महात्या केली होती. दिनांक 11 रोजी त्याचा सावडण्याचा कार्यक्रम होता

After the death of suicidal farmers, the place of funeral has been destroyed | आत्महत्याग्रस्त शेतक-याची मृत्युनंतरही विटंबना, उद्ध्वस्त केली अंत्यविधीची जागा 

आत्महत्याग्रस्त शेतक-याची मृत्युनंतरही विटंबना, उद्ध्वस्त केली अंत्यविधीची जागा 

Next

माजलगाव : तालुक्यातील पात्रुड येथील विलास काळे या शेतक-याने दोन दिवसांपूर्वी कर्जास कंटाळून आत्महात्या केली होती. दिनांक 11 रोजी त्याचा सावडण्याचा कार्यक्रम होता. सावडण्याचा कार्यक्रम करण्यासाठी आप्तेष्ठ नातेवाईक अंत्यविधीच्या ठिकाणी गेल्यानंतर नातेवाईकांना मृत शेतकर्यांची दहन केलेली जागाच रस्त्याचे काम करणा-या  टिपरने बुजवुन टाकल्याचे निदर्शनास आले त्यामुळे नातेवाईक संतप्त झाल्याने चांगलाच तनाव निर्माण झाला होता शेवटी गांवक-यांनी पुढाकार घेवून सदर अंत्यविधीच्या जागेवरील माती जेसीबीच्या सहाययाने बाजुला केली त्यानंतर नातेवाईकांनी अस्थिसंकलन केले, परंतु यानंतरही दिलीप बिल्डकाॅनविरुध्द तनावाची परिस्थिती पहावयास मिळत होती. 

पंढरपुर खामगांव या रस्त्याचे काम सद्या मोठया वेगाने सुरु असुन पात्रुड येथील नदीच्या पात्रातुन रस्त्याच्या कामासाठी मुरुम उपसा केला जात आहे. या नदीलगतच स्मशानभुमी आहे. दोन दिवसांपूर्वी कर्जास कंटाळुन आत्महत्या केलेल्या शेतकरी विलास काळे याचा अंत्यविधी याच स्मशानभुमीत करण्यात आला होता.

दरम्यानच्या काळात दिलीप बिल्डकाॅनच्या मजुर व कर्मचा-यांनी मुरुम या ठिकाणाहुन उचलतांना कसल्याही प्रकारचे भान न ठेवून अंत्यविधी झालेल्या जागेवरच वरच्या थराची माती ढकलली व जागा बुजुन टाकली. दि. 11 रोजी नातेवाईक अस्थि संकलनासाठी गेले असतां त्यांना ही बाब लक्षात आली आणि त्यांनी या बाबत जाब विचारायला सुरुवात केल्यास कंपनीच्या मजुरांनी सहकार्याची व अपराधिक भावना दाखविण्या ऐवजी हामरीतुमरी करण्याचा प्रयत्न केल्यामुळे वातावरण चिघळले व परिस्थिती तनावपुर्ण बनली. त्यानंतर गावातील कांही प्रतिष्ठितांनी यायत मध्यस्थी करीत  अंत्यविधी केलेल्या जागेवरील मुरुम बाजुला सारुन अस्थिसंकलनासाठीचा मार्ग मोकळा केला. दरम्यान या संपुर्ण घडामोडींमध्ये कांही काळानंतर तनाव जरी निवळला असला तरी दिलीप बिल्डकाॅनच्या विरुध्द चांगलाच रोष गांवक-यांमध्ये पहावयास मिळत होता. 

Web Title: After the death of suicidal farmers, the place of funeral has been destroyed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.