पलायन केलेल्या आरोपीच्या आवळल्या पुन्हा मुसक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 12:30 AM2019-02-17T00:30:50+5:302019-02-17T00:31:19+5:30

न्यायालयात हजर करून बाहेर काढल्यानंतर हातकडी लावताना पोलिसांना चकवा देत आरोपीने पलायन केल्याची घटना २ फेब्रुवारी रोजी घडली होती. त्याला शुक्रवारी पहाटे २ वाजता कर्नाटक राज्यातील धारवाड जिल्ह्यात बेड्या ठोकल्या.

After the escape of the accused, | पलायन केलेल्या आरोपीच्या आवळल्या पुन्हा मुसक्या

पलायन केलेल्या आरोपीच्या आवळल्या पुन्हा मुसक्या

Next

बीड : न्यायालयात हजर करून बाहेर काढल्यानंतर हातकडी लावताना पोलिसांना चकवा देत आरोपीने पलायन केल्याची घटना २ फेब्रुवारी रोजी घडली होती. त्याला शुक्रवारी पहाटे २ वाजता कर्नाटक राज्यातील धारवाड जिल्ह्यात बेड्या ठोकल्या. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली.
अनिल सुनील पवार (२०, रा. शिंदेनगर, बीड) असे पलायन केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर २०१७ मध्ये अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन अत्याचार केल्याचा गुन्हा नोंद आहे. घटनेपासून तो न्यायालयीन कोठडीत आहे. २ फेब्रवारी न्यायालयीन तारखेसाठी त्यास न्यायालयात आणले. न्यायाधिशांसमोर हजर करून बाहेर आल्यानंतर हातकडी लावताना त्याने पोलिसांच्या हाताला हिसका देऊन पलायन केले होते. त्याला त्याच्या शोधासाठी पथके रवाना झाली होती. १४ दिवस पोलीस त्याच्या मागावर होते. अखेर शुक्रवारी पहाटे त्याला कर्नाटक राज्यात बेड्या ठोकल्या.
ही कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अपर अधीक्षक वैभव कलुबरमे, पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे, सपोनि दिलीप तेजनकर, अमोल धस यांच्या मार्गदर्शनाखाली बालाजी दराडे, विष्णू चव्हाण, नरेंद्र बांगर, विकी सुरवसे आदींनी केली. शुक्रवारी दुपारी अनिलला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले.

Web Title: After the escape of the accused,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.