पुन्हा १० बळी, ५८० नवे रूग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:34 AM2021-04-08T04:34:20+5:302021-04-08T04:34:20+5:30
जिल्ह्यातील ३ हजार ५२९ संशयित रुग्णांची मंगळवारी कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचे अहवाल बुधवारी प्राप्त झाले. यात २ हजार ...
जिल्ह्यातील ३ हजार ५२९ संशयित रुग्णांची मंगळवारी कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचे अहवाल बुधवारी प्राप्त झाले. यात २ हजार ९४९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर ५८० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात ११४, आष्टी ७१, बीड १४६ , धारुर १५, गेवराई ३६, केज ५०, माजलगाव ३९, परळी ६०, पाटोदा १८, शिरुर २१ आणि वडवणी तालुक्यातील १० जणांचा समावेश आहे. तसेच २९२ रुग्ण कोरोनामुक्त झाले. बुधवारी दहा जणांच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाकडे झाली. यामध्ये, परळीच्या नाथनगर भागातील ६२ वर्षीय पुरुष, अंबाजोगाईच्या भटगल्लीतील ७५ वर्षीय पुरुष, परळीच्या बोरखेडमधील ६७ वर्षीय पुरुष, अंबाजोगाई शहरातील ४८ वर्षीय महिला, पाटोदा तालुक्यातील तांबा राजूरी येथील ६७ वर्षीय पुरुष, गेवराई शहरातील ६८ वर्षीय पुरुष, अंबाजोगाई तालुक्यातील तालुक्यातील येथील ७२ वर्षीय पुरुष, माजलगाव येथील ६५ वर्षीय पुरुष, अंबाजोगाई तालुक्यातील गिता येथील ३५ वर्षीय पुरुष,आणि केज येथील ९० वर्षीय पुरुषाचा मृतांमध्ये समावेश आहे.
दरम्यान, आता एकूण बाधितांचा आकडा २९ हजार ६७१ इतका झाला आहे. पैकी २५ हजार ७३८ कोरोनामुक्त झाले असून ६८२ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी.पवार, साथरोग अधिकारी डॉ.पी.के.पिंगळे यांनी ही माहिती दिली.