बीडमध्ये मराठा समाज आक्रमक; आरक्षणासाठी सोमवारी प्रत्येक गावात आंदोलन

By सोमनाथ खताळ | Published: September 30, 2023 06:47 PM2023-09-30T18:47:34+5:302023-09-30T18:49:26+5:30

प्रत्येक गावात, तालुका, जिल्ह्याच्या ठिकाणी हे आंदोलन केले जाणार आहे.

Aggressive Maratha community in Beed; Protest in every village on Monday for reservation | बीडमध्ये मराठा समाज आक्रमक; आरक्षणासाठी सोमवारी प्रत्येक गावात आंदोलन

बीडमध्ये मराठा समाज आक्रमक; आरक्षणासाठी सोमवारी प्रत्येक गावात आंदोलन

googlenewsNext

बीड : मनोज जरांगे पाटील यांच्या सुरु असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या समर्थनार्थ बीड जिल्ह्यात सोमवारी लाक्षणिक आंदोलन करण्यात येणार आहे. प्रत्येक गावात, तालुका, जिल्ह्याच्या ठिकाणी हे आंदोलन केले जाणार आहे.मराठा आरक्षणप्रश्नावर राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहेत.

मनोज जरांगे पाटील हे सध्या राज्याच्या दौऱ्यावर असून यादरम्यान त्यांच्या समर्थनार्थ बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. २ ऑक्टोबर रोजी बीड जिल्ह्यातील प्रत्येक गावात ग्रामपंचायत समोर, तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर तसेच जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत लाक्षणिक आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: Aggressive Maratha community in Beed; Protest in every village on Monday for reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.