परीक्षांसाठी केलेले आंदोलन थांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 01:12 PM2020-10-10T13:12:38+5:302020-10-10T13:12:58+5:30

एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने परळी तहसीलसमोर गुरुवारी सुरू केलेले ठिय्या आंदोलन तुर्तास मागे घेतल्याचे शुक्रवारी सायंकाळी आंदोलन कर्त्यांनी जाहीर केले.

The agitation for exams stopped | परीक्षांसाठी केलेले आंदोलन थांबविले

परीक्षांसाठी केलेले आंदोलन थांबविले

Next

परळी : एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने परळी तहसीलसमोर गुरुवारी सुरू केलेले ठिय्या आंदोलन तुर्तास मागे घेतल्याचे शुक्रवारी सायंकाळी आंदोलन कर्त्यांनी जाहीर केले. सकल मराठा समाजाने व मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले होते.

मात्र तालुक्यातील दादाहरी वडगाव येथील सकल मराठा समाजाचे साखळी आंदोलन अद्यापही चालूच आहे. आरक्षणावर निर्णय न झाल्याने आंदोलन मागे घेण्याचा अजून तरी विचार नाही, असे शिवाजी शिंदे यांनी सांगितले. परळी शहरात दि. ८ सप्टेंबरपासून तहसील कार्यालयासमोर सकल मराठा समाज व मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात आले होते.

Web Title: The agitation for exams stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.